आत्तापर्यंत तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढले असतील पण आता तुम्ही एटीएम मशीनमधून चक्क गरमा गरम स्वादिष्ट बिर्याणी काढता येणार आहे. हे वाचून तुम्ही थोडे आश्चर्यचकित झाला असाल पण खरचं, भारतातील एका शहरात पहिले बिर्याणी व्हेंडिग मशीन सुरु करण्यात आली आहे. ही मशीन अगदी एटीएम मशीनप्रमाणे काम करते. पण पैशांच्या जागी तुम्हाला त्यातून बिर्याणी मिळणार आहे. ही अनोखी बिर्याणी मशीन नेमकी कोणत्या शहरात आहे आणि ती कशी काम करते जाणून घेऊ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिर्याणी हा नॉनव्हेज खाण्याऱ्यांसाठी एक आवडीचा पदार्थ आहे. यामुळे भारतात सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये बिर्याणीचे नाव आघाडीवर घेतले जाते. पण बिर्याणीत व्हेज, नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांना खाद्यप्रेमी पसंती देतात. खाद्यप्रेमींची हीच आवड लक्षात घेत. चेन्नईतील कोलाथूरमधील एका स्टार्टअपने ही अनोखी बिर्याणी एटीएम मशीन सुरु केली आहे. या मशीनमध्ये पैसे टाकताच गरम बिर्याणी बाहेर येते. हे टेकआउट आउटलेट बाई बीटू कल्याणनने सुरु केले आहे. यामुळे खाद्यप्रेमींना आता आधुनिक तंत्रज्ञानासह गरम बिर्याणीचा आस्वाद घेता येत आहे.

या नवीन आउटलेटमध्ये ४ बिर्याणी व्हेडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. या बिर्याणी मशीनमध्ये ३२ इंचाची स्क्रीन बसवण्यात आली आहे. त्यात संपूर्ण मेन्यू सेट करण्यात आले आहेत. या मेन्यूमधून तुम्हाला आवडेल ती बिर्याणी निवडा. आता तुम्हाला एक क्यूआर कोड (QR Code) किंवा कार्डद्वारे पैसे भरावे लागतील. यानंतर तुमची ऑर्डर प्रोसेसिंग सुरु होते. आता स्क्रीनवर काउंटडाउन सुरु होते आणि काही मिनिटात तुमची बिर्याणी तुमच्यासमोर येईल. एटीएममधून ज्याप्रकारे पैसे येतात तसे बिर्याणीचे पॅकेट बाहेर येते. आता अनेकांना ही बिर्याणी एटीएम आकर्षित करत आहे. लवकरचं शहरातील इतर १२ ठिकाणी या मशीनचे आऊटलेट सुरु करण्याचे नियोजन आखले जात आहे.

या बिर्याणी मशीनचा व्हिडीओ वेट्टाई या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे बिर्याणी एटीएम मशीन कसे काम करते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. तुम्ही घर बसल्या ज्याप्रकारे ऑनलाईन फूड ऑर्डर करता त्याचप्रमाणे या मशीनवरूनही फूड ऑर्डर द्यावी लागते. तुमची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होताच काही मिनिटात गरमागरम बिर्याणी तुमच्या हातात येते. अनेकांनी ही कल्पना फार आवडली आहे त्यामुळे केवळ मशीनमधून बिर्याणी ऑर्डर करण्यासाठी लोक तिथे येत आहेत.

चेन्नईतील या रेस्टॉरंटमध्ये अस्सल प्रीमियम वेडिंग स्टाइल बिर्याणी दिली जाते. यावर कंपनीचा असा दावा आहे की, याठिकणी अन्न गॅसवर नाही तर कोळसा आणि लाकडावर शिजवले जाते. त्यामुळे त्या जेवणाचा सुगंध अगदी वेगळा असतो. हे रेस्टॉरंट २०२० पासून स्पेशल बिर्याणी खाद्यप्रेमींना सर्व्ह करत आहे. या बिर्याणीमध्ये ताजे मांस, भाज्या आणि क्लासिक बारामती तांदळाचा वापर केला जातो. याशिवाय मेनूमध्ये मटन पाया, इडियप्पमसारख्या स्वादिष्ट पदार्थांचाही समावेश आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biryani atm now hot and tempting biryani will be dispensed from atm in chennai sjr