Brawl Breaks Out On Flight : मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीटवरुन भांडण किंवा मारामारी झाल्याचे अनेक घटना आपण पाहिल्या असतील, केवळ मुंबई लोकलच नाही तर एसटी आणि बेस्ट बसमध्येही अनेकदा सीटसाठी प्रवासी भांडताना दिसतात. अनेकदा ही भांडण इतकी टोकाला जाऊन पोहोचतात की प्रवासी एकमेकांची डोकी फोडायला मागे-पुढे पाहत नाहीत. पण सीटसाठी विमानात राडा झाल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? जाणून आश्चर्य वाटलं ना. पण खरोखरच एका विमानात असा प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल खूप व्हायरल होतोय. यात दोन प्रवासी शिवागाळ करत मारण्यासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जात आहे. यावेळी इतर प्रवासी आणि केबिन क्रूने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात.

विमानात सीटवरुन लोकल ट्रेन स्टाइल राडा घातल्याचा प्रकार तैवानहून कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या EVA एअरच्या विमानात घडला आहे. यात विमानात बसलेले दोन प्रवासी सीट्सवरुन एकमेकांशी वाद घालत होते. त्यांचा हा वाद पाहता पाहता थेट हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. दोघे प्रवासी रागात मारण्यासाठी म्हणून एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. यावेळी त्यांना काही सहप्रवाशांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचे भांडण रोखता आले.

हेही वाचा – हृदयस्पर्शी! लग्नादिवशीच नवऱ्याने दिलेल्या अनपेक्षित ‘भेटीने’ नवरीला अश्रू अनावर; भावूक VIDEO व्हायरल

त्याचे झाले असे की, शेजारी बसलेला प्रवासी सतत खोकत असल्याने वैतागलेल्या बाजूच्या प्रवाश्याने आपली जागा बदलण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे या वादाला सुरुवात झाली. आपल्या बाजूचा प्रवासी सतत खोकत असल्याने तो प्रवासी दुसऱ्या प्रवाशाच्या सीटवर जाऊन बसला. यावेळी तो दुसरा प्रवासी परत आल्यावर त्याने त्या प्रवाशाला आपली सीट रिकामी करुन मागितली. पण त्या प्रवाश्याने काही सीट रिकामी केली नाही. ज्यामुळे हा वाद सुरु झाला. बाचाबाचीवरुन पाहात पाहता हा प्रकार थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारली. दरम्यान सहप्रवासी आणि केबिन क्रूने दोघांना एकमेकांपासून दूर करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघे एकमेकांबद्दल अपशब्द वापरत होते. दोघे मिळेल त्या पद्धतीने एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांच्या वादामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. या हाणामारीत फ्लाइट अटेंडंटच्या डोक्याला चुकून मार लागला.

अखेर इतर प्रवासी आणि केबिन क्रूच्या मध्यस्थीमुळे वाद मिटला, यानंतर शेवट विमानाने गंतव्यस्थानावर लँड करताच संबंधीत प्रवाशांना अटक करण्यात आली.

Story img Loader