मुला-मुलींनी परस्पर केलेला प्रेमविवाह आजदेखील अनेक कुटुंबीयांना मान्य नसतो. त्यामुळे अनेकदा दोन्हीकडील कुटुंबीय प्रसंगी टोकाचं पाऊल उचलतात. ज्यामध्ये ते पळून लग्न करणाऱ्या मुला-मुलींना मारहाणदेखील करतात. सध्या राजस्थानची राजधानी जयपूरमधून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये पळून लग्न केलेल्या मुला-मुलींचे अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण करण्यात आलेल्या जोडप्याच्या लग्नाला केवळ एक आठवडा पुर्ण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण केलेल्या जोडप्याचा १० मार्च रोजी प्रेमविवाह झाला होता, मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनीच त्यांचे अपहरण केल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या नवदाम्पत्याचं अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आली असून ती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये या जोडप्याला फिल्मीस्टाईलने पळवून नेल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…

जयपूरमधील जमवारामगढ येथील रहिवासी पृथ्वीराज वय २२ वर्ष आणि डोडाका डुंगर येथील पूजा योगी वय २१ वर्ष यांचा १० मार्च रोजी प्रेमविवाह झाला होता. या दोघांचेही अनेक वर्षांपासून अफेअर सुरू होते, त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं जयपूरच्या हरमाडा येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. तर १९ मार्च रोजी दुपारी मुलीचे कुटुंबीय हे नवविवाहित राहत असलेल्या घरी आले आणि त्यांच्याशी भांडण केलं आणि त्यानंतर दोघांचेही अपहरण केलं.

हेही पाहा- वॉचमनला चोर समजून बेदम मारहाण, तरुणाचा जागीच मृत्यू; पोलीस म्हणाले “तो तडफडत होता, लोक Mobile…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेनंतर मुलाचे वडील रामलाल यांनी हरमाडा पोलीस ठाण्यात आपल्या मुलाच्या व सुनेच्या अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. पीडित रामलाल यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा फायनान्समध्ये काम करतो आणि त्याचे पूजा योगी नावाच्या मुलीवर प्रेम होते. त्यानंतर दोघांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन १० मार्च रोजी आर्य समाज मंदिरात लग्न केलं होतं. शिवाय या लग्नाबाबत आपल्या मनात कोणत्याही प्रकारची नाराजी नव्हती, पण मुलीकडच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे त्या लोकांनीच पृथ्वीराज आणि पूजाचे अपहरण केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना देण्यात आलं असून पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.