Groom Funny Video: सध्या लग्नांचा सीझन सुरू आहे. लग्नसोहळा म्हटलं की फक्त रीतीरिवाज नाहीत, तर मस्ती, नाचगाणीशिवाय लग्न पूर्णच होत नाही. सोशल मीडियावर असे लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दररोज नवनवीन व्हिडीओ समोर येतात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने खास प्रयत्न करत असतो. अशाच एका उत्साही नवरदेवाचा सध्या सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाचा डान्स पाहून लोक अक्षरशः हसून लोटपोट झाले आहेत. 

लग्न म्हटलं की फक्त विधी नव्हे तर थोडी धमाल-मस्तीही हवीच असते. विशेषतः सध्या वधू-वराच्या डान्सचा ट्रेंड मोठ्या जोमात पाहायला मिळतोय. लग्नाचे हे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करून कायमस्वरूपी आठवणी बनवल्या जातात. अशातच सध्या एका नवरदेवाने आपल्या नवरीसाठी केलेला भन्नाट डान्स सध्या प्रचंड चर्चेत आहे. या डान्सने नवरीलाही हसू आवरता आलं नाही. हा मजेशीर व्हिडीओ पाहून युजर्सही खळखळून हसत आहेत. या अतिउत्साही नवरदेवाने सर्वांनाच हसवलं आहे.

नवरदेवाचा हटके अंदाज

सोशल मिडीयावरील लग्नाचे मजेशीर व्हिडीओ नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मिडीयावर लग्नाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  इंस्टाग्रामवर @praveshkumar2109 या युजरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नवरदेव ‘कयामत-कयामत’ या गाण्यावर डान्स करताना दिसतो. वरमालानंतर तो नवरीला आनंदी करण्यासाठी स्टेजवर येतो आणि धडाकेबाज डान्स करताना दिसतो. मात्र, त्याचे स्टेप्स इतके विचित्र आणि मजेशीर आहेत की नवरी गालातल्या गालात हसते.

नवरदेव काय स्टेप्स करतो हेच कळेना

नवरी हा सगळा प्रकार पाहून आपलं हसू आवरू शकत नाही. ती सुरुवातीला हसू लपवण्याचा प्रयत्न करते, पण अखेरीस ती थेट जोरात हसायला लागते. वराचा हावभाव, हालचाली आणि उर्जा पाहून सर्व पाहणारेही पाहुणेमंडळी खळखळून हसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडिओवर युजर्सचे भन्नाट कमेंट्स

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्स म्हणतात, “भाऊ, नाच तू करतोयस, पण लाज मलाच वाटतेय!”, तर दुसऱ्यानं म्हटलं, “यात वेगळाच आत्मविश्वास दिसतोय”, अशाच प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.