Viral video: काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये नववधू आणि नवरदेवांचे अनेक पारंपरिक प्रसंग किंवा अनेक किस्से कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे दिसतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल खूप पसंत केले जातात. असाच लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका नवरीला लग्नाच्यावेळी बॉयफ्रेंडचा फोन आला आणि नवरीनं रडत रडत लग्न मोडलंय. दरम्यान नवरदेव मंगळसूत्र घालणार त्याचवेळी ती लग्नाला नकार देते आणि यानंतर नवरदेव काय करतो हे तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नासाठी नवरा नवरी सज्ज होते. मंडप सजला होता. दोन्ही कुटुंबातले सर्व लोक एकत्र आले होते. ब्राम्हण मंत्रौच्चार करत होते. मंगलाष्टके पडण्याची वेळी जवळ आली होती. काही क्षणातच नवरा नवरीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधणार होता. पण तेवढ्यातच एक फोन नवरी मुलीला आला. त्यानंतर तिने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं. आपल्याला हे लग्न करायचं नाही असं तिने स्पष्ट पणे सांगितलं. शिवाय आपलं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचं ही तिने सांगितलं. मुलगी लग्नाला तयार नसेल तर आपण लग्न करणार नाही असं नवऱ्या मुलाने ही सांगितलं. हे सर्व होत असताना मुलीचा बॉयफ्रेड लग्न मंडपात पोलिसांना घेलून पोहोचला. त्यानंतर नवरीचा हात पकडून तो लग्न मंडपातूनच तिला घेवून गेला. सर्व जण पाहातच राहीले. अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे.

ही घटना कर्नाटक राज्यात घडली आहे. कर्नाटकातील हासन तालुक्यातील बूवनहळ्ळी गावातील पल्लवी आणि आलूर तालुक्यातील वेणुगोपाल यांचे लग्न ठरले होते. त्यानुसार हासन शहरातील श्री आदिचुंचनगिरी कल्याण मंडपात लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व कुटुंबीय नातेवाईक जमले होते. लग्नाची जय्यत तयारी झाली होती. सर्व काही तयार होते. आता फक्त नवरीच्या गळ्यात मंगळसुत्र बांधण्याचे बाकी होते. त्याच वेळी एका फोनने गडबड केली आणि एकच खळबळ उडाली. नवऱ्या मुलीने सर्वांच्या समोर लग्नास नकार दिली. आपल्याला लग्न करायचं नाही असं तिने स्पष्ट केलं

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.