Bride video viral : ‘ट्रॅफिक’ ही एक युनिव्हर्सल समस्या आहे. तुम्ही जगात कुठल्याही कानाकोपऱ्यात जा जर तुम्ही बाय रोड प्रवास करत असाल तर ट्रॅफिकशी सामना हा होतोच. शहरांमध्ये ट्रॅफिक जॅममध्ये अडकणे हे काही नवे नाही. ट्रॅफिकमधला गोंधळ आणि सततचे हॉर्न याच्यामध्ये सगळ्यांचीच जणू बाहेर पडण्यासाठी अक्षरश: शर्यत लागलेली असते. यादरम्यान कोणी सिग्नल तोडून निघून जातो तर काही जण विरुद्ध दिशेने जाण्यासही घाबरत नाहीत. मग वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर दादागिरी सुरू होते. पण काही लोक या ट्रॅफिकमधून निघण्यासाठी वेगवेगळा जुगाड करतात. अन् हा वाया जाणारा वेळ सत्कारणी लावण्यात भारतीय महिलांचा हात कोणीच धरू शकत नाही, असं म्हटलं जातं. होय, अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका शहरात नवरी ट्रॅफिकमध्ये अडकली, तिकडे लग्नाचा महुर्त जवळ येत होता अशातच नवरीनं काय डोकं लावलं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नवरीचं कौतुक कराल.
वाहतुकीत वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी तिनं कशी शक्कल लढवलीये ती पाहा. लोक म्हणतायेत, अशी हुशारी फक्त मराठी महिलांकडे असू शकते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या व्हिडीओमधील महिला ट्रॅफिक जॅममध्ये अडकली आहे. पण तिनं इतरांसारखं हॉर्न वाजवून वेळ वाया न घालवता गुपचूप बाईकवर लग्नाचं स्थळ गाठलंय.
नवरी बाईचा मेकअप, पारंपिक लग्नाचा पोशाख आणि सर्व तयारीही झाली होती. संध्याकाळच्या लग्नाचा मुहुर्तही जवळ आला होता, पण लग्नाच्या हॉलच्या मार्गावर त्याच वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नवरी आणि सर्व मंडळी ठरलेल्या वेळेच्या आधी लग्नस्थळी पोहोचू शकत नव्हती.नवरी मुलगी बाईकवरुन जात असताना रस्त्यावरील एका व्यक्तीने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ spreadit_india या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या महिलेचं कौतुक केलंय. नेटकरी म्हणतायेत, अशी हुशारी फक्त मराठी महिलांकडे असू शकते