Bride Shocking Video: लग्न प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न समारंभ अगदी आनंदात साजरा केला जातो. लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं.

आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात.

आधीच्या काळी अरेंज मॅरेज जास्त प्रमाणात व्हायचं, आधी अनेकदा नवरीला नवरा कोण हेदेखील माहित नसायचं. सध्या अशीच काहीशी परिस्थिती एका नवरीबरोबर घडलीय. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात भर मंडपातच नवरीला धक्का बसतो. नेमकं काय घडतं जाणून घेऊ या…

नवरीला बसला धक्का (Bride Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लग्नसोहळा पार पडतोय. या लग्नसोहळ्यात नवरी तोंडावर पदर घेऊन बसली आहे. तर नवरदेव तिच्या बाजूलाच बसला आहे. नवरीच्या डोक्यावर पदर असल्याने तिच्या डोक्यावरचा पदर काही लोक बाजूला करतात जेणेकरून ती नवरदेवाला पाहू शकेल. पण जसा डोक्यावरचा पदर हटतो नवरीला खूप मोठा धक्काच बसतो. ती ज्या मिनिटाला नवरदेवाला बघते त्याचक्षणी जोरात किंचाळते आणि बेशुद्ध होऊन खालीच कोसळते. यावरून असं लक्षात येतंय की, कदाचित नवरीने नवऱ्याला पहिल्यांदाच पाहिलं असेल आणि त्यांच्या वयोमानात खूप अंतर असल्याने तिला धक्का बसला आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय, हे अद्याप कळू शकलं नाही.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @its_sankyaa_editts या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “नवरदेव बघून धाडकन थांबली” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

नववधूचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “चाचा जोमात भाभी कोमात” तर दुसऱ्याने “दीदी तर घाबरूनच गेली” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “म्हातारा बघून नवरी घाबरली”