भाऊ आणि बहीण यांच्यातील नाते टॉम आणि जेरीसारखे असते. एकमेकांशी भांडतात, एकमेकांवर रागावतात; पण दुसऱ्या क्षणाला कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीला धावूनही जातात. त्यामुळे कालांतराने यांच्यातील नाते अधिक मजबूत होते. आज सोशल मीडियावर या नात्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. १५ वर्षांपूर्वी भाऊ-बहिणीने केलेला डान्स बहिणीच्या संगीत कार्यक्रमाच्या निमित्ताने रिक्रिएट करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, भाविका या तरुणीचा संगीत कार्यक्रम सुरू असतो. या कार्यक्रमाला आणखीन खास करण्यासाठी नवरी आणि तिचा भाऊ दीप सुंदर डान्स सादर करतात. बॉलीवूड चित्रपट ‘ता रा रम पम’मधील ‘अब तो फॉरएव्हर’ या गाण्यावर ते नाचताना दिसत आहेत. पण, तुम्ही पाहिलं असेल की, त्यांनी लहानपणीसुद्धा या गाण्यावर हुबेहूब डान्स केला होता. तर अगदी तेव्हा करण्यात आलेल्या डान्स स्टेप्स आणि आठवणी त्यांनी पुन्हा एकदा या या कार्यक्रमात रिक्रीएट केल्या आहेत. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…शिट्टी नव्हे तर ‘डान्स ’ करून करतात वाहतूक नियंत्रण; पाहा अनोख्या ट्रॅफिक पोलिसांचा ‘हा’ व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

हा डान्स शिकविणाऱ्या (कोरिओग्राफ) श्रेया सावला यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भाऊ-बहीण या दोघांनी एकत्र परफॉर्म करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पंधरा वर्षांपूर्वीही त्यांनी लहानपणी अशाच पद्धतीने डान्स केला होता; जो बहिणीच्या लग्न समारंभातील संगीत या कार्यक्रमात रिक्रिएट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सुरुवातीला लहानपणीचा; तर आताचा डान्स असा हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे; ज्यात तुम्हाला कोणताच फरक दिसून येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shreyasavlachoreography आणि @bhavikachhabs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘आतापर्यंत पाहिलेला सर्वांत सुंदर व्हिडीओ’ , ‘तुमच्या दोघांच्या उंचीव्यतिरिक्त लहानपणी आणि आताच्या व्हिडीओत काहीच बदललेलं नाही’ अशा स्वरूपाच्या कमेंट्स अनेकांनी; तर काही जण या भावा-बहिणीच्या जोडीला पाहून भावूक होऊन प्रसिद्ध फ्रेंड्स या मालिकेतील लाडकी पात्रे मोनिका आणि रॉस यांच्या उपमा देताना कमेंट्समध्ये दिसून आले आहे.