दिवसभर गाड्यांच्या आवाजात, प्रदूषणाचा सामना करत वाहतूक पोलीस काम करत असतात. वाहन चालकांना ट्रॅफिक नियमांची आठवण करून देणाऱ्या आणि रस्त्यावर विनाकारण ट्रॅफिक होऊ नये याची काळजी घेणाऱ्या वाहतूक पोलिसांचे हाल बिकट होऊन जातात. पण, आज सोशल मीडियावर अशा एका ट्रॅफिक पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ; जो तुम्ही अनेकदा तुमच्या इन्स्टाग्राम ॲपवर रील स्क्रोल करताना पहिला असेल. काय आहे या ट्रॅफिक पोलिसामध्ये खास चला पाहूयात.

तर या अनोख्या ट्रॅफिक पोलिसांचे नाव रणजीत सिंह असे आहे. रणजीत सिंह हे इंदोरचे रहिवासी आहेत. इंदोरमध्ये ते वाहतुक नियंत्रण करण्याचे काम करतात. दिवसरात्र उभं राहून काम करावे लागत असले तरीही हे ट्रॅफिक पोलीस अनोख्या शैलीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवतात. रस्त्याच्या मधोमध उभं राहून ट्रॅफिक पोलीस डान्स करत सर्वांवर लक्ष ठेवतात. एकदा तुम्हीसुद्धा पाहा ट्रॅफिक पोलिसांचे अनोखे कौशल्य.

हेही वाचा…हा तर कहरच! चहा बनविण्यासाठी पणत्यांचा उपयोग; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘पुढच्या वेळी वीट…

व्हिडीओ नक्की बघा :

तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, वाहतूक पोलीस शिट्टी वाजवून किंवा रागावून नाही तर डान्स स्टेप्स करत ट्रॅफिक नियंत्रण करताना दिसत आहेत. रणजीत सिंह रस्त्याच्या अगदी मधोमध उभे आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना हातवारे करून काही हटके डान्स मूव्ह करताना सुद्धा दिसत आहेत ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर या ट्रॅफिक पोलिसांना त्यांच्या अनोख्या शैलीमुळे ओळखले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ रणजीत सिंह यांच्या अधिकृत @thecop146 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आपलं काम अत्यंत मजेदार पद्धतीने करणाऱ्या या ट्रॅफिक पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांच्या कामाचे आणि डान्स कौशल्याचे विविध शब्दात कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.