Bhaubeej 2023 : भाऊबीज हा बहिण भावातील अतूट नात्याचा सण आहे. या दिवशी भावाला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी बहिण पूजा करते आणि त्याला ओवाळते.सोशल मीडियावर भाऊबीजनिमित्त अनेक बहिण भावाचे मजेशीर आणि भावनिक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
त्यातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहिणीला ट्रॅम्पोलिनवरुन खाली उतरवण्यासाठी भाऊ चक्क घोडा बनताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की छोटी बहिण ट्रॅम्पोलिनवर उभी असते. ट्रॅम्पोलिन ही एक अशी चटई आहे की यावर उडी मारली की आपण आणखी उंच उडतो. लहान मुलांना यावर खेळताना आणखी मजा येते. यावर एक चिमुकली खेळत असते पण खेळून झाल्यानंतर तिला खाली उतरायचे असते तेव्हा भाऊ मदत करतो.बहिणीला खाली उतरवण्यासाठी भाऊ चक्क घोडा बनतो. बहिण त्याच्या पाठीवर पाय ठेवून खाली उतरते.
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.काही लोकांना व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या बहिण भावाची आठवण येऊ शकते.
हेही वाचा : खरं प्रेम! म्हतारपणीही सोडली नाही पत्नीची साथ, थकलेल्या आजीला आजोबांनी असा दिला आधार; व्हिडीओ एकदा बघाच
69funman हा इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहिण भावाचे प्रेम”
बहिण भावाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते.बहिण भाऊ फक्त एकमेकांबरोबर नाही तर एकमेकांसाठी सुद्धा भांडतात. एकमेकांना जीवापेक्षा जास्त जपतात. याच नात्याचा उत्सव साजरा करणारा सण म्हणजे भाऊबीज होय.