९० च्या दशकातील निर्माची जाहिरात तुम्हाला लक्षात असेलच. विशेषत: ‘दूध सी सफेदी निर्मासे आये रंगीन कपडा भी खिल खिल जाये,’ हे वाक्य तर तुम्हाला तोंडपाठ असेल. दरम्यान एका व्हिडिओमध्ये लोकप्रिय बीटीएस ग्रुपचे सदस्य या गाण्यावर नृत्य करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

किशन झुनझुनवाला या इन्स्टाग्राम युजरने डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बीटीएसचे सदस्य आरएम, जीन, जे होप, सुगा, जिमीन, व्ही आणि जुंगकूक हे निर्माच्या जिंगलवर नृत्य करताना दिसून येत आहे. मुळात ही क्लिप डान्स प्राक्टिसची आहे जी बिग हिट म्युझिकद्वारे शेअर करण्यात आली आहे. बिग हिट ही एजन्सी बीटीएसचे व्यवस्थापनाचे काम पाहाते. व्हिडिओतील कोरिओग्राफी ही पर्मिशन टू डान्स या हिट गाण्यावर करण्यात आली आहे. मात्र, व्हिडिओला निर्माचे गाणे देऊन त्यावर या ग्रुपचे नृत्य दाखवण्यात आले आहे.

(Viral : हैदराबादमध्ये पावसाचा कहर, पाण्यात बाईकसह वाहून गेली व्यक्ती, पाहा व्हिडिओ)

व्हिडिओतील नृत्यावर निर्माचे गाणे इतक्या चांगल्या प्रमाणे बसवण्यात आले आहे की, तरुण निर्माच्या गाण्यावरच नृत्य करत असल्याचे वाटते. प्रत्येक स्टेप्स हे गाण्याशी सुसंगत आहे. हा अप्रतिम व्हिडिओ नेटकऱ्यांना भरपूर हसवत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १३ हजार व्ह्युज मिळाले आहेत. नेटकऱ्यांना व्हिडिओ एडिटिंग पसंत पडली असून अनेकांना निर्माच्या गाण्याशी सुसंगत झालेले हे नृत्य खूप आवडत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीटीएसचे सलग दोनवेळा ग्रामी अवार्डसाठी नॉमिनेशन झाले होते. बटर हे त्यांचे अल्बम खूप लोकप्रिय झाले होते. कतारमध्ये या वर्षी फिफा विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. यात बीटीएस आपले कार्यक्रम सादर करणार आहे.