महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. ते ट्विटरवर अनेक मजेशीर आणि प्रेरणादायी ट्वीट करतात आणि त्यांचे ट्विट व्हायरलही होतात. त्यांच्या या ट्वीट्समुळे ते नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांचे असेच एक ट्वीट व्हायरल झाले आहे. आनंद महिंद्रा यांच्या पत्नीने त्यांना चांगली झोप घेण्यासाठी एक अजब सल्ला दिला होता, याचाच खुलासा त्यांनी स्वतः या ट्वीटमधून केला आहे.

खरंतर, संयुक्त राष्ट्राच्या माजी पर्यावरण कार्यकारी संचालक एरिक सोल्हेम यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी आनंद नावाच्या एका रुग्णासाठी डॉक्टरांनी सुचवलेला औषधांच्या कागदाचा फोटो शेअर केला होता. या कागदामध्ये झोप न लागण्याच्या समस्येवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी एक अजब सल्ला दिला होता.

आजीला नवरीच्या वेशात पाहून पुन्हा एकदा प्रेमात पडले आजोबा; अशी रिअ‍ॅक्शन दिली की…; पाहा Viral Video

या कागदावरील सल्ल्यामध्ये लिहले होते की चांगली झोप लागण्यासाठी तुमचा संगणक आणि मोबाइलफोन फेकून द्या. औषधांच्या या कागदावरील रुग्णाचे नाव वाचून महिंद्रा यांनी ही ट्विट रिट्विट केले. यावेळी त्यांनी सोल्हेम यांना म्हटलंय, “मला असे वाटते तुम्ही हे ट्विट माझ्यासाठीच केले आहे. विशेष म्हणजे, माझ्या पत्नीने कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही मला खूप वर्षांपूर्वीच हे करायला सांगितले होते.” दरम्यान, आनंद महिंद्रा यांच्या इतर पोस्टप्रमाणेच ही पोस्टही सध्या तूफान व्हायरल झाली आहे.

ड्रायव्हिंग टेस्ट आहे की चक्रव्यूह? वाहनचालकाचे भन्नाट कौशल्य पाहून तुम्हीही चक्रावून जाल; Viral Video एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक युजर्स महिंद्रा यांच्या या ट्विटवर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले, “आता या ट्विटनंतर प्रत्येक भारतीय महिला आपल्या पतीला टोमणे मारतील आणि पुरावा म्हणून हे ट्विट दाखवतील.” तर इतर काही युजर्सने लिहिलं आहे, “सर तुम्ही डॉक्टरांची ही शिफारस कधीपासून लागू कराल आणि तुमचा संगणक आणि मोबाइल फेकून द्याल यांची तारीख कृपया आम्हाला सांगा. त्या दिवशी आम्ही ही उपकरणे झेलण्यासाठी तुमच्या बाल्कनीखाली ब्लँकेट घेऊन उभे राहू.”