भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले जाते. त्याचा सोशल मीडियावरच नाही तर रिअल लाइफमध्येही मोठा चाहता वर्ग आहे. चाहते धोनीला थाला, माही, कॅप्टन कूल अशा अनेक नावांनी ओळखतात. क्रिकेट जगतातील या दिलखुलास खेळाडूने केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही असे काही केले आहे की संपूर्ण जग त्याच्या साधेपणाचे चाहते आहे. मग ते बाईक / कारमध्ये लिफ्ट देण्याची गोष्ट असो किंवा रस्त्याच्या कडेला बसून चहा पिणे असो. माही कधीच सेलिब्रिटी असल्यासारखा वावरत नाही. नुकताच धोनीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक चाहते आता धोनी आमचा पण मित्र असता तर… अशी इच्छा व्यक्त करुन दाखवत आहेत.

धोनी नेहमीच सामान्य लोकांप्रमाणे राहतो. लोकांमध्ये मिसळतो, याच साधेपणाने तो अनेकांची मने जिंकतो. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओतही धोनीचा तोच साधेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धोनी एका सामान्य कुटुंबातील मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी जातो. यावेळी मित्राने केक कापल्यानंतर धोनी त्याला मागून पकडतो आणि चेहऱ्यावर केक लावताना दिसतो.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण केक कापताना दिसत आहे. तरुणाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी धोनी त्याच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांबरोबर सहभागी झाला आहे. तरुण केक कापून प्रथम धोनीला भरवत असतो. पण धोनी त्याला थांबवतो आणि प्रथम आई – वडील व भावाला केक भरवायला सांगतो.

यानंतर तो स्वतः केक खातो आणि त्या तरुणालाही भरवतो. इतकेच नाही तर त्याला व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला केकचा तुकडा देत सांगतो की, केक याच्या चेहऱ्याला लाव. मग काय धोनी त्याचे हात मागून पकडतो आणि तो व्हिडिओ शूट करणारा बर्थ डे बॉयच्या चेहऱ्यावर केक लावतो.

माहीच्या साधेपणाने जिंकली युजर्सची मने

हा व्हिडिओ @kerketta_siddharth नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – वाढदिवसाच्या शुभेच्छा भाई! या व्हिडीओवर धोनीचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक यूजर्सनी लिहिले की, ते माहीच्या साधेपणाचे चाहते झाले आहेत. तर काही जण म्हणाले की, धोनी खरोखरच डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. अशाप्रकारे अनेक युजर्स माहीच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.