आपल्यामध्ये जरा म्हणून संयम नसतो, म्हणजे बघा ना गाडी चालवता काही सेकंदसुद्धा अनेकांना सिग्लनवर उभं राहता येत नाही. तेव्हा एकतर सिग्नल तोडून नियम मोडायचे किंवा काही सेकंद जरी थांबावे लागले की हॉर्न वाजवून समोरच्या व्यक्तीला हैराण करायचं. त्यातून समोरून पादचारी येत असेल तर अनेकांना आणखीच चेव येतो. त्यांना जाऊ देतील तर शपथ. ‘ते रस्ता ओलांडेपर्यंत कोण थांबतंय? आपण जाऊ कट मारून’ असे म्हणणारे ‘स्टंटमॅन चालक’ आपल्याकडे कमी नाही. तेव्हा या सगळ्यांनी काही सेकंद वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पाहायला हवा.
‘चायना डेली’ या फेसबुक पेजवरून व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधून बरंच काही शिकण्यासारखं आहे. चीनच्या एका चौपदरी रस्त्यावरचा हा व्हिडिओ आहे. एक वृद्ध महिला रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होती, पण वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे तिला रस्ता ओलांडणे अवघड जात होते. त्यातूनही तिची मदत करण्यासाठी कोणी तयार नव्हतं. गाड्या येत-जात होत्या. तेव्हा एका वाहतूक पोलिसाने तिला हटकले आणि आपली गाडी विरुद्ध दिशेला चालवत आणली आणि बरोबर झेब्रा क्रॉसिंगच्या इथे आडवी लावली. त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्यांना पुढे जाता येईना. सर्व गाड्या रस्त्यात थांबून राहिला. कदाचित सुरूवातील हा व्हिडिओ पाहून अनेकांना हा पोलीस उद्धट वाटला असेलही. असे करून त्याला नेमके काय साधायचे होते हेही लक्षात येत नाही, पण जसा व्हिडिओ पुढे सरकतो तसं मात्र या पोलिसाबद्दल कौतुक वाटू लागतं. आता त्याने नेमक असं काय केलं हे पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल.
काय मग तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला ना? तर मग लगेच हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित हा व्हिडिओ पाहून अनेक जण या पोलिसांच्या चांगल्या वागणूकीचे अनुकरण करू लागतील.