मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार आहे, त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तर आज याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व मतदारांच्या मतदान जागरुकतीला चालना देण्यासाठी चेन्नईतील स्कूबा डायव्हर्सच्या एका ग्रुपने अनोखा उपक्रम राबवला आहे. या तरुणांनी ‘अंडर वॉटर वोटिंग अव्हेरनेस’ हा उपक्रम राबवला आहे.

चेन्नईतील सहा स्कूबा डायव्हर्सच्या ग्रुपने एक अनोखी मतदार जागृती मोहीम हाती घेतली. समुद्राच्या खोलवर जाऊन त्यांनी मतदान प्रक्रिया दाखवली आहे. या स्कूबा डायव्हर्सनी साठ फूट पाण्याखाली जाऊन मॉक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) घेऊन मतदान प्रक्रियेचे अनुकरण करून आणि मतदान जागृतीचे फलक दाखवले. तुम्हीसुद्धा पाहा हा अनोखा उपक्रम.

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
vande bharat loco pilot crying at retirement day celebration in bengaluru
VIDEO : अन् शेवटच्या दिवशी फुटला अश्रूंचा बांध, वंदे भारत ट्रेनच्या निवृत्त कर्मचाऱ्याला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Pranab Mukherjee and P Chidambram
‘RBI बँक सरकारची चीअर लीडर’, माजी गव्हर्नरकडून युपीए सरकारवर खळबळजनक आरोप

हेही वाचा…Fact check: भाजपाचे उमेदवार अशोक तंवर यांच्या गाडीवर हल्ला? व्हायरल होणार VIDEO नेमका कुठला? वाचा सत्य

व्हिडीओ नक्की बघा :

टेम्पल ॲडव्हेंचरचे स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षक आणि संचालक एसबी अरविंद थरुनश्री यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, सुरुवातीला सहा स्कूबा डायव्हर्स बोटीतून पाण्यात उड्या घेतात व पाण्याखाली जाऊन मतदान करताना दिसतात. एका तरुणाच्या हातात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आहे, तर दुसरा मतदान करताना दिसत आहे, तर तिसरा तरुण बोटावर लावलेली निळ्या रंगाची शाई दाखवताना दिसत आहे.

देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करीत आहे. उमेदवारांना निवडून देण्यासाठी कुठे मोर्चे, तर कुठे रॅली, तर मोठमोठी पोस्टर्स रस्त्यांवर लावलेली दिसून येत आहेत. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४४ दिवसांच्या सात टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. देशभरातील ९७ कोटींहून अधिक पात्र मतदारांसह ही निवडणूक सर्वात मोठी ठरणार आहे.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ECISVEEP या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे.