How to clean kitchen: दिवाळीच्या सणापूर्वी घर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरात रोज जेवण बनवताना तेल, मसाले आणि इतर पदार्थांचे डाग लागतात. जर ते वेळेत साफ केले नाहीत तर टाइल्सवर चिकट डाग, पिवळसर थर जमा होतो. घरच्या घरी साध्या उपायांनी स्वयंपाकघर स्वच्छ आणि नव्यासारखे चमकदार ठेवता येते. खाली काही सोप्या टिप्स दिल्या आहेत, ज्याने तुमचे स्वयंपाकघर साफ आणि चमकदार होईल.

१. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा :

टाइल्सवरील चिकट तेल आणि हट्टी डाग काढण्यासाठी एक कप व्हिनेगर आणि २ चमचे बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण टाइल्सवर लावा, १० मिनिटे राहू द्या, नंतर ब्रशने घासा आणि पाण्याने धुवा. परिणामस्वरूप डाग आणि चिकटपणा दोन्ही निघून जातात.

२. लिंबू आणि मीठ :

जिद्दी डागांसाठी लिंबू अत्यंत प्रभावी आहे. अर्ध्या लिंबात थोडे मीठ लावून टाइल्सवर रगडा. काही मिनिटांनी ओल्या कापडाने पुसून टाका. लिंबाची आम्लता आणि मिठामुळे टाइल्सला त्वरित चमक येते.

३. बेकिंग पावडर पेस्ट :

३ चमचे बेकिंग पावडर आणि थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाइल्सच्या ग्राउट्सवर लावा, १५ मिनिटांनी ब्रशने घासून धुवा. जुनी धूळ आणि घाण सहज निघून जातात.

४. डिशवॉश लिक्विड आणि व्हिनेगर :

अर्धा कप डिशवॉश लिक्विड आणि अर्धा कप व्हिनेगर स्प्रे बाटलीत मिसळा. टाइल्सवर थोडा वेळ स्प्रे करून पुसून टाका, त्यामुळे चिकटपणा आणि घाण दूर होईल, तसेच टाइल्सला हलकी चमक मिळते.

५. टूथपेस्ट वापरून :

जुन्या टूथब्रशवर थोडी टूथपेस्ट लावून टाइल्सच्या जॉइंट्स घासल्यास हलके डाग आणि पिवळसर थर निघून जातात.

६. ब्लीच आणि पाणी :

२ चमचे ब्लीच एक कप पाण्यात मिसळा. स्पंजने टाइल्स पुसा आणि १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. जुने डाग दूर होतात.

७. गरम पाणी आणि व्हिनेगर :

टाइल्सची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी एका बालदीत गरम पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळा आणि टाइल्सवर शिडकवा, काही वेळानंतर पुसून टाका, यामुळे वास निघून जातो.