Street Theft Video Viral Video आजकाल चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भररस्त्यात महिलांच्या गळ्यातून साखळी खेचणे, मोबाईल हिसकावणे, एखाद्याला भूल देऊन त्याच्या जवळील पैसे किंवा मौल्यवान वस्तूंची चोरणे, कधी थेट घरात किंवा दुकानात घुसून चोरी करणे अशा कित्येक घटनांचे व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये सामसूम रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला गाठून चोरीचा प्रयत्न करत होता पण हुशार तरुणीने चोराला अद्दल घडवली आहे.

तरुणीने चोराला दिला चकवा

व्हिडीओमध्ये दिसते की, एका सामसूम रस्त्यावरून एका कारमधून तरुणी जात आहे. जशी करून कार थांबवते तसा तिचा पाठलाग करणारा चोर तिच्या जवळ पर्स खेचून घेण्यासाठी येतो. चोराला चकवण्यासाठी तरुणी आधी कारच्या भोवती फेरी मारते चोरही दुचाकी घेऊन तिच्या मागे मागे येतो. त्यानंतर तरूणी तिच्या हातातील पर्स लांब फेकून देते. चोर पर्स आणण्यासाठी दुचाकी कारजवळ थांबवतो अन् धावत पर्स आणायला जातो. तरुणी संधी साधून त्याच्या दुचाकीची चावी काढून घेते अन् कारमध्ये बसते. पर्स घेऊन जेव्हा चोर परत येतो तेव्हा चोराला लक्षात येते की त्याचा दुचाकीला चावी नाही. चावी घेण्यासाठी जसा तो कारच्या हात आत टाकतो तशी ती तरुणी कारची काच बंद करते आणि त्याचा हात कारमध्ये अडकवते. त्यानंतर बाईकपासून काही अंतर पुढे कार नेते. चोराला कारच्या दरवाजात अडकवून ती मदतीसाठी बहुदा पोलिसांना फोन करते.”

तरुणीची हुशारी पाहून नेटकरी थक्क झाले आहे. अनेकांनी तिचे कौतुक केले. व्हिडिओ smile_please_1956 नावाच्या पेजवर पोस्ट काला आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एकाने लिहिले की, पण मी म्हणतो, “तिला कारमधून उतरण्याची काय गरत होती”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्याने चोराला टोला लगावत म्हटले, क्या चोर बनेगा रे तू (कसा चोर होणार रे तू)