Viral video: सध्या सोशल मीडिया हे मनोरंजनाचं सर्वांत मोठं साधन बनलं आहे. तुमच्यापैकी अनेकजण फावल्या वेळेत फेसबुकवरील व्हिडिओ किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स बघत असतील. या व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात तर काही फारच मजेशीर असतात.ग्रामीण भागात बहुतेक विद्यार्थी सायकलने शाळेत आणि शिकवणीला जातात. ग्रामीण भागात हिवाळ्यात शाळेत जाणे कठीण काम मानले जाते. कारण समोर धुकंच धुक असतं. पण ही वाट सोपी होते जेव्हा कोणी तुमच्यासोबत प्रवास करते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दाट धुक्यात एक जोडपे शिकवणीला जात आहे. मात्र यावेळी त्यांचा सायकलवर सुरु असलेला रोमान्स पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे पाठीवर बॅग, खांद्यावर हात ठेवून सायकल चालवत असल्याचे दिसत आहे. दोघेही सायकलवर एकत्र शिकवणीला जात आहेत. या व्हिडिओला लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ @wtfpratyush या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तर काहींनी यावर टीकाही केली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे जोडपे वेगवेगळ्या सायकलवर दिसत आहे, मात्र पुढे जाऊन तरुण तरुणीच्या खांद्यावर हात टाकतो आणि एकाच हातानं सायकल चालवतो. एवढंच नाहीतर तो तिला किसही करतो. त्यानंतर दोघंही सायकल चालवत निघून जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लेकरांना सांभाळा रे! खेळता खेळता चिमुकला गटरात पडला; हात पाय मारत राहिला पण…हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जोडप्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. या आधी देखील सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मेट्रो ट्रेन, लोकल ट्रेन तसेच अन्य ठिकाणी प्रेमीयुगुलांचे रोमान्स करतानाचे असे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. अशा प्रेमीयुगुलांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून पोलिसांकडे केली जात आहे.