Couple Romance Video: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजच्या काळात कपल्स गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही अगदी कशाचीही चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल अश्लील चाळे करताना दिसत आहे.

पाण्याच्या टाकीमागे कपलचा रोमान्स (Couple Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक कपल आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून पाण्याच्या टाकीच्या मागे अश्लील चाळे करताना दिसतायत. एकमेकांना किस करत दोघंही लपून छपून रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं आहे. अनेकजण संतप्त होऊन कपलवर राग व्यक्त करतायत तर काहीजण व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला खडेबोल सुनावतायत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @lets_famous_memes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “वॉटर टॅंकचा मजेसाठी वापर कसा करावा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ६४ लाखांपेक्षा व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, यांना ओयोची गरज नाही. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “कल्पना करा की हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि भीतीने त्या दोघांनी आत्महत्या केली तर? फक्त काही व्ह्युज आणि एंगेजमेंटसाठी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका” तर तिसऱ्याने “पण या सगळ्या गोष्टी करण्याची गरजच काय” अशी कमेंट केली.