Crocodile attack: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अगदी सिंह, वाघ, बिबट्या अशा शक्तिशाली प्राण्यांचंही मगरीसमोर काही चालत नाही. हे प्राणीसुद्धा मगरीला घाबरतात. मगर किती क्रूर प्राणी आहे, याचा अंदाज अनेकदा लोकांना नसतो. अशाच एका मगरीच्या चतुराईचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

चिखलात लपून बसलेल्या मगरीचा भयानक हल्ला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वत्र चिखल आहे. मात्र याच चिखलात अतिशय शिताफिनं ही मगर लपली आहे. यावेळी एक व्यक्ती तिथे असतो. मगर त्याच्यावर बारीक नजर ठेऊन असते, त्या व्यक्तिला याची बिलकूल कल्पना नसते कारण मगरीनं स्वत:ला चिखलात व्यवस्थितपणे लपवलेलं असतं. मात्र क्षणात संधी साधून ही मगर या व्यक्तीवर हल्ला करते, दरम्यान यावेळी हा व्यक्ती थोडक्यात वाचतो. आणि तिथून पळ काढतो. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे ज्यामध्ये हे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Jay Brewer (@jayprehistoricpets)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्यांदा पाहताना हे दृश्य नेमकं काय आहे, हे तुम्हाला समजणार नाही. मात्र काही वेळातच एक मगर या व्यक्तिच्या अंगावर हल्ला करते. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असून चांगलाच व्हायरल झाला आहे.