वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं. मुली वडिलांच्या खूप लाडक्या असतात. खरंच त्या ‘पापा की परी’ असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मुलगी वडिलांसाठी नक्कीच तेवढी खास असते. आपल्याला इंटरनेटवर बाप-लेकीच्या प्रेमाचं, त्यांच्या बाँडिंगचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे.

लाडक्या लेकीनं बाबांसाठी तयार केला नाश्ता

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या वडिलांसाठी एक चिमुकली नाश्त्याची प्लेट आणते. मात्र, पुढे जे घडले ते पाहून तुम्हाला त्या लहान मुलीचे तुम्हालाही थोडे वाईट वाटेल. एक लहान मूलगी टोस्टची प्लेट घेऊन तिच्या वडिलांच्या खोलीत चालत जाताना पाहू शकता. तिची आई संपूर्ण एपिसोड रेकॉर्ड करत होती. खोलीत पोहोचल्यावर तिने वडिलांच्या हातात डीश देण्याचा प्रयत्न केला मात्र ती खाली पडते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: वो स्त्री है कुछ भी कर सकती है…१० हजार फूट उंचावर तरंगत केला मेकअप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. मुलगी आणि वडील यांचे नाते हे अतिशय खास नाते असते. या नात्यात एकप्रकारचा गोडवा असतो. वडिलांसाठी मुलगी ही राजकन्येपेक्षा कमी नसते. त्याच वेळी, प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना बालपणात एक सुपरहिरो म्हणून पाहते.