आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार न करता मुलगी मृतदेहासोबतच राहत असल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने घऱातच आईचा मृतदेह ठेवला होता. तब्बल सहा महिन्यांपासून मुलगी आईच्या मृतदेहासोबत राहत होती. शेवटी हा मृतदेह पूर्णपणे सडला. ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमेरिकेत ही घटना घडली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या ५४ वर्षीय महिलेचं नाव किम्बर्ले हेलर आहे. हेलरने आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृतदेह कित्येक महिने घरातच लपवून ठेवला. आईमुळे मिळत असलेल्या सुखसुविधा बंद होऊ नयेत यासाठी तिने हे कृत्य केलं.

हेलरने आपल्या वयस्कर आईला मिळणारी पेंशन, विम्याची रक्कम आणि सरकारी सुविधा बंद होऊ द्यायच्या नव्हत्या. यामुळे तिने मृत्यूनंतरही आई जिवंत असल्याचं दर्शवलं. जवळपास सहा महिने ती आपल्या आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य करत होती. यादरम्यान हा मृतदेह पूर्णपणे सडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात हेलरच्या आईचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या १८ नोव्हेंबरला हेलरला अटक करण्यात आली. इतके दिवस तिने आईचा मृतदेह घरातच लपवलेला होता. यादरम्यान ती कोणालाही घऱात येऊ देत नव्हती. गेल्या अनेक महिन्यांपासून हेलरची आई दिसत नसल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी जबरदस्ती घरात घुसून मृतदेह ताब्यात घेतला. तपासादरम्यान नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.