सध्या सर्वत्र लगीनसराई सुरू आहे. लग्नातील पाहुणे मंडळींचे विशेष आकर्षण म्हणजे डान्स. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होत सर्व पाहुणेमंडळी अशा प्रसंगांमध्ये मनसोक्त डान्स करतात. अशी गाणी आपल्या कानावर पडली किंवा आपल्या आजुबाजुला एखादा असा कार्यक्रम सुरू असेल तर आपल्याला ही डान्स करण्याचा मोह अनावर होतो. असेच काहीसे एका डिलीवरी बॉयसोबत घडले, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी लग्नसोहळ्यात पाहुणेमंडळी डान्स करत असताना, बाहेर रस्त्यावर एक डिलीवर बॉयही डान्स करत असल्याचे दिसत आहे. ‘सपने मे मिलती है..’ या लोकप्रिय गाण्यावर हा डिलीवरी बॉय भन्नाट डान्स करताना दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: Video: वाळवंटात राहणारा उंट जेव्हा बर्फाळ प्रदेशात पहिल्यांदा जातो; मन जिंकणारी त्याची प्रतिक्रिया एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या डिलीवरी बॉयच्या डान्सने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत, अनेकांनी यावर कमेंट करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. ‘प्रत्येकाने याप्रकारे मनसोक्त डान्स करत त्या क्षणाचा आनंद लुटावा,’ अशा कमेंट्स काही जणांनी केला आहे.