Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका जावा-जावांचा हळदीतल्या कार्यक्रमात जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हळदीच्या कार्यक्रमात या दोघींनी संबळच्या तालावर भन्नाट डान्स केला आहे. एकापेक्षा एक भारी एक्स्प्रेशन देत आहेत. या व्हिडिओमधल्या महिलांचा डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. दाघीही इतक्या सुंदर नाचत आहेत, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. त्यांचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय. दोघींती ही अदा पाहून सर्वच फिदा झाले आहेत. आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.
पाहा व्हिडीओ
प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी संभळीवर नवरी लग्नात थिरकली आहे. पारंपारीक पद्धतीने वाजणाऱ्या संभळच्या तालावर नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. यावेळी नवरीसोबत इतर महिलांनीही ठेका धरत डान्स केला आहे.