Rangoli Designs Video : दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे. देशात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळी हा पाच दिवसांचा सण असतो. या पाच दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या दिवाळीची सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. फराळ, फटाके, कपडे, रांगोळी, दिवे, डेकोरेशनचे सामान इत्यादी वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते. तुम्हालाही रांगोळी काढायची आवड आहे का? मग यंदा दिवाळीत पाच दिवसांमध्ये कोणती रांगोळी काढणार आहात? जर तुम्ही अजुनही विचार केला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सध्या सोशल मीडियावर रांगोळीचे एकापेक्षा एक सुंदर असे व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातील काही निवडक व्हिडीओ येथे पाहा. या व्हिडीओच्या मदतीने यंदा दिवाळीत तुम्ही तुमच्या घरी खूप सुंदर रांगोळ्या काढू शकता. (Diwali Rangoli Designs watch video before make rangoli in Diwali, List of Rangoli Designs on Instagram and YouTube)

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

रांगोळीचे महत्त्व (Importance of Rangoli Designs)

रांगोळी ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. ही एक परंपरा आणि लोककला आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढली जाते. कोणताही सण, उत्सव, मंगळकार्य, समारंभ, विवाह, पूजा आणि शुभ कार्य असेल तर आवडीने रांगोळी काढली जाते.
आजही अनेक घरांसमोर अंगणामध्ये रांगोळी काढली जाते. आजही ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी अंगणात शेणमातीचा सडा टाकला जातो व त्यानंतर रांगोळी काढली जाते. देवघर, उंबरठा, तुळशी वृंदावनाजवळ सुद्धा रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळदी कुंकू वाहणे शुभ मानले जाते.

हेही वाचा : Bengaluru Man Post : बंगळुरुतील माणसाच्या कूककडे आहे स्वतःचा स्वयंपाकी, सोशल मीडियावर ‘या’ चर्चांना उधाण

u

हेही वाचा : कोचिंग सेंटर आहे की टॉर्चर सेंटर? शिक्षकाने काठी घेऊन विद्यार्थ्यांबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले

रांगोळीचे प्रकार (Types of Rangoli)

रांगोळीचे अनेक प्रकार आहे. काही प्रकार खालीलप्रमाणे –

ठिपक्यांची रांगोळी – या पद्धतीने पुर्वी खूप रांगोळी काढली जायची.

संस्कारभारती रांगोळी – हा अतिशय लोकप्रिय रांगोळीचा प्रकार आहे. सणावाराला या प्रकारच्या रांगोळी आवडीने काढले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय चैत्रांगण रांगोळी, फुलांची रांगोळी, पोट्रेट रांगोळी आणि बॉर्डर रांगोळीसारखे प्रकार दिसून येतात.