Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वारसा असो किंवा खाद्य संस्कृती नेहमी चर्चेचा विषय असतो. पुणेरी पाट्या आणि मराठी भाषेविषयीचे प्रेम तुम्हाला पुण्यातच सापडेल. शनिवार वाडा, लाल महाल, आगाखान पॅलेस, दगडूशेठ गणपती मंदिर इत्यादी ठिकाणे अतिशय लोकप्रिय असून पर्यटक आवर्जून येथे येतात पण पुण्यात काही जुने प्राचीन मंदिर आहेत जिथे भाविक आवर्जून जातात. आज आपण अशाच एका मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. या मंदिराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील एका मंदिराचा आहे. श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर असे या प्राचीन शिवमंदिराचे नाव आहे. हे पु्ण्यातील ७०० वर्ष जूने प्राचीन शिवमंदिर आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. मंदिराला भव्य द्वार असून उंच कळस आहे. मंदिराचे सभामंडप अतिशय आकर्षक असून तुम्हाला काळा रंगाचा नंदी दिसेल. त्यानंतर व्हिडीओत महादेवाची पितळेची पिंड आहे. याशिवाय मंदिरात इतर लहान मोठी मंदिरे सु्द्धा आहेत. तुम्ही कधी या ठिकाणी गेला नसाल तर नक्की या ठिकाणी जाऊन या. शंकर महादेवाच्या भक्त येथे जाऊ शकतात.

हेही वाचा : VIDEO : “घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती…” नितीन गडकरींचा घराचे महत्त्व सांगणारा जूना व्हिडीओ होतोय व्हायरल

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मंदिर कुठे आहे? टेन्शन घेऊ नका या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये या मंदिराचा पत्ता सांगितला आहे. iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर, शनिवार पेठ, नदी पात्र, मनपा भवन, पुणे, महाराष्ट्र”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हर हर महादेव” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर इमोजी शेअर केले आहेत.

पुण्यात असे अनेक प्राचीन जूने मंदिरे आहेत. या मंदिरांना प्राचीन इतिहास लाभलेला आहे. काही मंदिरे अगदी जशीच्या तशी आहे. या मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता आणि पुण्याच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूंविषयी जाणून घेऊ शकता.