हैदराबादमधील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका ५० वर्षीय रुग्णाच्या पोटातून विक्रमी १५६ किडनी स्टोन काढल्याचा दावा केला आहे. ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र हे खरं आहे. डॉक्टरांनी यासाठी शस्त्रक्रियेऐवजी लेप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपीचा वापर केला. देशात या प्रक्रियेचा वापर करून रुग्णाच्या किडनीतून सर्वाधिक स्टोन काढल्याचा पहिलाच प्रकार आहे. या प्रक्रियेला सुमारे तीन तासांचा अवधी लागला.

रुग्ण आता निरोगी असून त्याच्या नियमित दिनचर्येत परतला आहे. हा रुग्ण हुबळीहून आला होता आणि त्याला प्रीती युरोलॉजी आणि किडनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व्यवसायाने शाळेतील शिक्षक बसवराज मडिवलर यांना अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर केलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणात किडनी स्टोन दिसून आले होते.

Viral: पाळीव कुत्र्याने वाचवला लहान मुलीचा जीव; आई भावुक होत म्हणाली जर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या रुग्णाला एक्टोपिक किडनीचा त्रास देखील आहे. किडनी त्याच्या सामान्य स्थितीत मूत्रमार्गाऐवजी त्याच्या पोटाजवळ आहे. रूग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘असामान्य ठिकाणी किडनी असणे हे कोणत्याही समस्येमुळे नसले तरी, असामान्य ठिकाणी उपस्थित असलेल्या किडनीतील स्टोन काढून टाकणे निश्चितच आव्हानात्मक होते. या रुग्णाला दोन वर्षांहून अधिक काळ हे खडे झाले असतील, पण याआधी त्याला कधीही लक्षणे जाणवली नाहीत. पोटात अचानक दुखू लागल्याने त्याची तपासणी केली असता किडनीमध्ये नवीन खडे आढळून आले.’