गेल्‍या काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात सातत्‍याने वाढ झाल्याने लोकांना आता उन्‍हाच्‍या झळा बसू लागल्‍या आहेत. दिवसा तप्त ऊन सोसवे ना झाले आहे. त्‍यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, दुपारी सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळत आहे. येत्‍या दोन महिन्‍यांत उन्‍हाचा तडाखा आणखीच वाढण्याची शक्‍यता आहे. या उन्हाच्या झळांनी फक्त माणूसच नव्हे तर प्राणी सुद्धा त्रस्त झाले आहेत. उन्हाची कहीली दूर करण्यासाठी एका कुत्र्याने चक्क स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पूढे काय झालं ते पाहण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर हा स्विमिंग करणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहण्यासाठी जितका मजेदार आहे तितकाच धक्कादायक सुद्धा आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा कडक उन्हामुळे अस्वस्थ होऊन स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे. यानंतर व्हिडीओमध्ये जे काही घडतं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. आपण पाहू शकता की, एक कुत्रा उन्हाच्या काहीलीला त्रासलेला आहे आणि अतिशय सुंदर दिसणार्‍या स्विमिंग पूलजवळ फेऱ्या मारत आहे. उन्हाच्या झळा सोसत असताना समोर इतका थंडगार स्विमिंग पूल असताना यात एकदा तरी डुबकी मारून यावं अशी कुणाची नाही इच्छा होणार? मग या कुत्र्यालाही आवरलं नाही आणि त्याने थोडावेळ इकडे तिकडे पाहत नंतर स्विमिंग पूलमध्ये उडी घेतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा आधी स्विमिंग पूलाजवळ उभा राहतो आणि कधी स्विमिंग पूलकडे पाहतो. तर कधी मागे वळून पाहतो. तो पाहतो की कोणी येत नाही. यानंतर तो पटकन स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. व्हिडीमध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट इथेच घडते. आपण पाहू शकता की काही सेकंद पोहल्यानंतर, कुत्रा अचानक पाण्यात डुबतो. यानंतर मागील दोन्ही पाय वर करून तो बराच वेळ पाण्याखाली राहतो. हा कुत्रा नक्की डुबतो की काय अशी भीती निर्माण होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नियमांची ‘ऐशी तैशी’! थेट बंदूक घेऊन कार्यक्रमात पोहोचला हा व्यक्ती, भरपूर नाचला पण आता….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : विशालकाय अजगराने वासरावर केला हल्ला, पुढे काय झालं? पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुत्रा पाण्यात बुडत असताना तो अगदी माणसाप्रमाणे त्याचे पाय पाण्यात मारताना दिसत आहे. मात्र, नंतर तो मोठ्या आनंदाने आंघोळ करून पाण्याबाहेर येतो. तुम्ही बघू शकता की, ज्याप्रमाणे माणसे पाण्यात उडी घेऊन आंघोळ करतात, त्याचप्रमाणे कुत्राही तलावात स्नान करतो. यासोबतच तो बुडण्याचं नाटकही करतो. व्हिडीओ पहायला खूप मजेदार आहे. हा व्हिडीओ @buitengebieden_ नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. लोक हा व्हिडीओ वारंवार पाहू लागले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ८.८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.