मद्यपान हे धोकादायक आरोग्यासाठी धोकादायक आहे पण मद्यपान केल्यानंतर काही लोकांचे स्वत:वरील नियंत्रण सुटते. अनेकदा हे लोक मद्यपान करून भररस्त्यात गोंधळ घालतात किंवा मद्यपान करून वाहन चालवतात ज्यामुळे अपघात होतात. मद्यपान करून लोक इतरांत्रा त्रास देतात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीवही धोक्यात टाकतात सोशल मीडियावर अनेकदा धक्कादायक प्रकार समोर येतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. देहरादूनच्या रायपूरमध्ये एका वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ही क्लिप ऑनलाइन शेअर करणाऱ्या एक्स वापरकर्त्यांच्या मते, घटनेच्या वेळी ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती होती.

व्हिडीओमध्ये दिसते की, काळ्या स्लीव्हलेस टॉप आणि डेनिम घातलेली एक महिला रस्त्याच्या मधोमध बसलेली आहे. रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरु आहे तरीही तिला त्याची भिती किंवा कसली पर्वा दिसत नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या मधोमध बसून ती त्यांच्या मार्गात अडथळा आणताना दिसत आहे. जमिनीवर बसलेली ही तरुणी थोडीशी पुढे झुकलेली दिसत आहे आणि तिच्या चप्पलपैकी एक नीट पायात घालत आहे.

तिच्याभोवती वाहतूक कोंडी होऊनही ती महिला जमिनीवरून हलली नाही. ती रस्त्यावर बसलेली असताना, बाजूच्या लेनमधून दुचाकी ये-जा करत आहेत. एक कार तिच्यामुळे रस्त्यावरच अडकलेली होती आणि ती व्यक्ती मार्ग मोकळा होण्याची वाट पाहत होती. महिलेला रस्त्यावरून बाहेर पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने हॉर्नचा आवाज येत राहिला.

काही दुचाकीस्वार तिच्या जवळून जात दिसत आहे, ते लोक तिच्याकडे पाहत आहे पण कोणीही तिला मदत करण्याची तसदी घेतली नाही. काही सेकंदांनंतर, व्हिडिओमध्ये काही पुरुष, ज्यात दोन सुरक्षा रक्षकांचा समावेश होता, त्या महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. ते तिच्या जवळ गेले आणि तिला रस्त्याच्या कडेपर्यंत चालत नेले, जेणेकरून परिसरात वाहतूक सुरळीत होईल.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत, या प्रकरणात पोलिस कारवाईचे कोणतेही वृत्त नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षाच्या सुरुवातीला, हरिद्वा उत्तराखंड येथूनही अशीच एक घटना घडली होती. रात्रीच्या वेळी सलवार कुर्ता परिधान केलेली एक महिला वाहतुकीत अडथळा आणताना आणि ऑटोरिक्षावर उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसली. दिल्ली-डेहराडून महामार्गावरील व्हीव्हीआयपी घाट (हर की पौडी) जवळ हा प्रकार घडला होता आणि त्यात असे म्हटले गेले की, ती महिला मद्याच्या नशेत होती.