Ek Number Tuzi Kambar Video Viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धीसाठी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणं खूप व्हायरल होत आहे. त्यावर कलाकारांपासून रील स्टार्सपर्यंत अनेकांनी रील्स बनवलेल्या आपण पाहिल्याच असतील. पण, सध्या या ट्रेंडिंग गाण्यावर एका चिमुकलीने स्कूटरवर बसून डान्स केला आहे. असं दिसतंय या गाण्यावर थिरकण्याचा मोह तिला आवरला नाही.
चिमुकलीचा डान्स व्हायरल (Dance Video Viral )
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक चिमुकली धावत्या स्कूटरवर मागच्या सीटवर बसून संजू राठोडच्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर मनसोक्त डान्स करताना दिसतेय. आईच्या मागे बसलेली मुलगी अगदी प्रवासाचा आनंद घेत ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसतेय. अगदी हुबेहूब डान्स स्टेप्स करत चिमुकलीने सगळ्यांचं मन जिकंलंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @punepulse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ४४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “जेव्हा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले असता पण तुमच्या मुलाकडे तुमच्या प्लेलिस्टपेक्षा चांगल्या मुव्ह्ज असतात”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
चिमुकलीच्या डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे क्यूट आहे पण सुरक्षित नाही”, तर दुसऱ्याने “खूपच भारी” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “खूप गोड आहे चिमुकली ” तर अनेकांनी हेल्मेट न घातल्यामुळे माय-लेकीवर टिका केली आणि लिहिलं, हेल्मेट घालायला जमत नाही हे जमतं.