अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक भावनिक, हृदयाला स्पर्श करणारे आणि विचार करायला लावणारे व्हिडीओ समोर येत आहेत. काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, काही प्रेरणा देतात, तर काही असे असतात की, पाहताना मनात एक खोल वेदना उमटते. या डिजिटल युगात भावना व्यक्त करण्याचं आणि शेअर करण्याचं सर्वांत मोठं माध्यम म्हणजे सोशल मीडिया बनलं आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत पोहोचते.

अशाच भावनिक व्हिडीओंपैकी एक सध्या दोन लहान मुलांचा एक भावनिक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या मुलांनी त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा त्रास अनुभवला आहे. हा व्हिडीओ फक्त एक दुःखद घटना दाखवत नाही, तर माणसांच्या भावना आणि खरी माणुसकी काय असते, हेही दाखवतो.

हा व्हिडीओ एका बस अपघातानंतरचा असल्याचे सांगितले जाते, ज्यात अनेकांचे प्राण गेले. त्यात या दोन मुलांच्या आई-वडिलांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर या मुलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. तो एका प्रवाशाने किंवा प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केला असल्याचे दिसते. व्हिडीओ ट्विटर या प्लॅटफॉर्मवर पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच तो देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडीओत दोन लहान मुले रस्त्याच्या कडेला उभी दिसतात. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत आणि चेहऱ्यावर दुःख दिसतं. तरीही त्या दोघांमध्ये एक आपुलकी जाणवते. एक मूल दुसऱ्याचे अश्रू पुसतं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतं आणि त्याला धीर देतं. हे दृश्य इतकं भावनिक आहे की, पाहताना कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. त्या क्षणी दोन्ही मुलांनी एकमेकांसाठी दाखवलेलं प्रेम आणि धीर देणं या बाबी खूप हृदयस्पर्शी वाटतात

पाहा व्हिडिओ

या व्हिडीओखाली सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या. एका व्यक्तीनं लिहिलं आहे, “आई-वडिलांशिवायचं जग खूप कठीण असतं; पण ही मुलं एकमेकांचा आधार बनली आहेत.” दुसऱ्यानं म्हटलं आहे, “देव या मुलांसाठी नक्की काहीतरी चांगलं करेल, हीच इच्छा आहे.” अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर करीत लिहिलं आहे की, ही दृश्यं म्हणजे माणुसकी आणि आपुलकीचं खरंखुरं उदाहरण म्हणून सांगता येईल.

हा छोटा व्हिडीओ फक्त एका दुःखद घटनेचा भाग नाही, तर तो आपल्याला एक मोठं सत्य सांगतो, की कठीण वेळी आधार, प्रेम व एकमेकांवरचा विश्वास हेच खरं बळ असतं. या दोन मुलांच्या डोळ्यांतील आशा आणि आपुलकी पाहून सगळ्यांना वाटलं की, आपल्यामधली माणुसकी अजूनही जिवंत आहे.