एक असा काळ होता जेव्हा खेळणी खरेदी करण्याची खरी मजा रस्त्यावरील फेरीवाल्यांकडूनच होती. कोणी फिरकवाला असू द्या की डमरूवाला लहान मुलं त्याच्याकडूनच खेळणी घेण्याचा हट्ट करायची. तर संगीताची आवड असणारी मुलंदेखील रस्त्यावरील बासरीवाल्याकडून बासरी विकत घ्यायची, पण गॅजेट्सच्या जमान्यात ही स्वदेशी खेळणी आता विकलीही जात नाहीत आणि फार बघितलीही जात नाहीत. म्हणून कधी एखाद्या विक्रेत्याला विचारून बघा की, दोन वेळचं पोट भरू शकाल इतक्या बासरी विकल्या जातात का? याचे उत्तर बहुधा नाही असेच असेल. ही व्यथा त्या लोकांची आहे, ज्यांना फक्त बासरीच नाही तर त्याचे सूरही चांगलेच माहीत आहेत, पण आता परिस्थिती अशी आहे की, ते दिवसभर रस्त्यावर फेरीवाल्यांप्रमाणे ते ६० रुपयेही कमवू शकत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बासरी विक्रेत्याने व्यक्त केल्या वेदना

लिव्ह फॉर फूड नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका बासरी विक्रेत्याची व्यथा शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात अनेक बासरी घेऊन फिरत आहे. त्याच्याकडील बासरी विकल्या गेल्या तर त्याला दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करता येईल या आशेने तो दिवसभर रस्त्यावर फिरतोय. पण दिवसभर उन्हात घाम गाळून त्याला जेमतेम ६० रुपये मिळाले आहेत. पण ६० रुपयांनी पोट भरणार का, असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे. या वेळी एका तरुणाने बासरी विक्रेत्याला काय झाले विचारले, त्यावर त्या विक्रेत्याचे डोळे भरून आले. या वेळी भरल्या कंठाने बासरी विक्रेत्याने बासरीवर सूर छेडले आणि आपल्या वेदनाही सांगितल्या.

ना उन्हाचा तडाखा, ना पावसाची भीती, तयार केला असा देसी जुगाड; video पाहून युजर्स म्हणाले, काका तुम्ही…

व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने केली मदत

हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने बासरी विक्रेत्याला मदत केली. पण तो बासरी वादक इतका दु:खी होता की त्याला आपली व्यथा सांगताना डोळ्यांतून पाणी येत होते. या वेळी व्हिडीओ बनवणाऱ्याने त्याला मदत केली, ज्यामुळे इन्स्टाग्रामवर युजर्स मदत करणाऱ्यांचे तोंड भरून कौतुक करत आहेत. काहींना बासरीवादकाच्या वेदना ऐकून दु:ख होत आहे. एका युजरने लिहिले की, हा व्हिडीओ पाहून मला रडू येत आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, देव तुम्हाला सर्व काही देवो. तर काही युजर्स त्या बासरीवादकापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे नाव आणि तो कुठे उभा असतो याबाबत चौकशी करीत आहेत. बासरीवादकाचा हा भावनिक व्हिडीओ पाहून आता अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आपण नेहमी पाहतो. रस्त्याच्या कडेला अनेक लहान लहान विक्रेते फुले, पेन अशा छोट्या छोट्या गोष्टी विकण्यासाठी बसलेले असतात. अत्यंत गरीब परिस्थितीचा सामना करणारे हे विक्रेते एक तरी वस्तू विकली जाईल या आशेवर असतात. याच गोष्टींवर त्यांचे पोट अवलंबून असते. त्यामुळे अशा विक्रेत्यांकडून आपणही एक तरी वस्तू खरेदी केली पाहिजे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of struggling flute seller playing flute went viral sjr
First published on: 24-05-2023 at 11:04 IST