आपण अनेकदा पाहतो की बाइकवर दोनपेक्षा अधिकजण बसलेले असतात. परंतु, वाहतुकीच्या नियमांनुसार, बाइकवर दोनपेक्षा अधिक लोक बसू शकत नाहीत. याशिवाय बाइकवर बसलेल्या दोन्ही माणसांना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. असे असताना देखील लोक वाहतुकीचे नियम सर्रास मोडताना दिसतात. या सगळ्यात त्यांना आपल्या जीवाची देखील पर्वा नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका स्कुटीवर अनेक लोक बसलेले दिसत आहेत. या स्कुटीवर इतके लोक बसले आहेत, ज्यांना मोजणे कठीण जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी ही स्कुटी चालवणाऱ्याला ‘हेव्ही ड्रायव्हर’ म्हणत आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या स्कुटीवर इतके लोक बसलेले असताना देखील हा इसम अगदी वेगात स्कुटी चालवत आहे.

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Viral Video: पोलीस दिसताच दंड टाळण्यासाठी तरुणीने वाढवला स्कुटीचा वेग; त्यानंतर जे झालं ते पाहून हैराण व्हाल

व्हिडीओमध्ये आपण स्कुटीवर जवळपास अर्धा डझन लोक बसले आहेत. मात्र, स्कुटीवर नेमके किती लोक बसले हे कळू शकलेले नाही. स्कुटीवर बसलेल्यांची नेमकी संख्या सांगण्यात नेटकऱ्यांचाही गोंधळ उडाला आहे. काही लोकांना स्कूटीमध्ये ५ लोक बसलेले दिसत आहेत, तर काहींना ६ लोक दिसत आहेत. सध्या बहुतांश लोक स्कूटीवर बसलेल्यांची नेमकी संख्या सांगण्यात अपयशी ठरले आहेत.

स्कूटी चालवणारी व्यक्ती गजबजलेल्या रस्त्यावर अनेक मुलांना शाळेत सोडायला जात असल्याचे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ दिल्लीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तीने स्कूटीवर अनेक बॅगा पुढे ठेवल्या आहेत. स्कुटीवर पाच मुले बसलेली तर एक मुलगा असलेला दिसत आहे. एक मुलगी अर्धवट दिसत आहे. गाडीचा थोडासा तोल गेल्यास स्कूटीचा धोकादायक अपघात होऊ शकतो. Himanshutiwari68 नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exactly how many people are sitting on this scooter netizens also got shocked after watching the viral video pvp
First published on: 26-03-2022 at 12:39 IST