Fact Check Of Manoj Bajpayee Viral Video : ‘लाईटहाऊस जर्नालिजमला’ मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे आढळले. या व्हिडीओत अभिनेता बिहार निवडणुकांपूर्वी राष्ट्रीय जनता दल (RJD) चा प्रचार करताना दिसत आहे. पण, तपासात आम्हाला समजले की, हा व्हिडीओ एडिट केलेला आहे आणि मनोज बाजपेयी यांनी कोणत्याही प्रचार व्हिडीओत काम केलेले नव्हते.
काय होत आहे व्हायरल?
राजश्री यादव यांनी @Rajshree Yadav या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.facebook.com/reel/23884959674514502
इतर युजर्सदेखील तसेच दावे करून व्हिडीओ शेअर करीत आहेत.
https://www.facebook.com/reel/1851125652169788
https://www.facebook.com/share/v/1FsJR9wFRk
https://www.facebook.com/reel/826154183120024
तपास :
आम्हाला या जाहिरात दाखवणाऱ्या व्हिडीओत वॉटरमार्क आढळले, ज्यावर ‘स्पूफ’ (Spoof) असे लिहिले होते.
त्यानंतर आम्ही जाहिरातीतील मुख्य स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून पहिले.
आम्हाला तीच जाहिरात ‘प्राइम व्हिडीओ भारत’च्या यूट्यूब चॅनेलवर आढळली. अभिनेत्याच्या प्राइम व्हिड४ओ जाहिरातीला राजकारणाचा ऑडिओ जोडून एडिट करण्यात आला आहे.
इथे स्पष्टपणे दिसते आहे की, व्हायरल झालेला व्हिडीओ एडिट करून ‘RJD’च्या प्रचार व्हिडीओसारखा दाखवण्यात आला आहे.
त्यानंतर आम्हाला मनोज बाजपेयी यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘एक्स’वर शेअर केलेली पोस्ट आढळली. त्यात अभिनेत्याने कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते मनोज बाजपेयी एका राजकीय पक्षाचा प्रचार करीत असल्याचे दाखवणारी मोठ्या प्रमाणात प्रसारित होणारी जाहिरात एडिट केलेली आहे. त्यांनी ती जाहिरात शूट केलेली नाही. हा मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असलेला दावा खोटा आहे.