Nitish Kumar meeting Lalu Prasad Yadav Viral Photo Fact Check : २४३ जागांसाठी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. ही विधानसभा निवडणूक ६ व ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत होणार आहे आणि त्याचे निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होतील. पण, यादरम्यान ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असणारा एक फोटो आढळला आहे. या फोटोमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, तसेच बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते नितीश कुमार दिसत आहेत.
हा फोटो शेअर करणारे युजर्स असा दावा करीत आहेत की, बिहार निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणाची समीकरणे आता बदलणार आहेत आणि हा फोटो नुकत्याच झालेल्या त्यांच्या भेटीचा आहे.
पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा फोटो जुना आहे आणि तो दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जातो आहे.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर सुनील कुमार यादवने @sunilkumaryadaw.yadaw या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो ‘बिहारमध्ये निवडणुकीचं वातावरण रंगत चाललं आहे आणि यादरम्यान तुम्ही पाहू शकता की, नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आहे’, अशा कॅप्शनसहित शेअर केला आहे.
इतर युजर्स देखील असाच दावा करत हाच फोटो शेअर करताना दिसत आहेत…
https://www.facebook.com/share/p/1BRASQu1GA
तपास:
आम्ही व्हायरल फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला. मग तेव्हा आम्हाला हा फोटो ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या २०२३ च्या रिपोर्टमध्ये आढळला.
https://timesofindia.indiatimes.com/india/bihar-cm-nitish-meets-lalu-in-delhi-discusses-current-political-situation/articleshow/99415261.cms
या रिपोर्टमध्ये म्हटले होते, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मंगळवारी येथे आले आणि त्यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यांची भेट घेतली. २०२४ च्या संसदीय निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी आणि या बैठकीत ते सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करीत असल्याचे समजते आहे.”
त्यानंतर आम्हाला हा फोटो इतर मीडिया प्लॅटफॉर्मवरही आढळला.
https://www.indiatoday.in/india/story/bihar-cm-nitish-meets-lalu-in-delhi-discusses-current-political-situation-2358809-2023-04-12
या रिपोर्टमध्येही तेच म्हटले होते, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांची भेट घेतली, ज्यादरम्यान २०२४ च्या संसदीय निवडणुकीत भाजपाचा सामना करण्यासाठी विरोधी बाजू मजबूत करण्याच्या प्रयत्नांदरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे”.
https://www.siasat.com/nitish-reaches-delhi-to-meet-opposition-leaders-starts-with-lalu-prasad-2566665
दुसऱ्या एका वृत्त रिपोर्टमध्ये म्हटले होते, “राष्ट्रीय राजधानीत (दिल्लीत) पोहोचल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची कन्या व राज्यसभा सदस्य मिसा भारती यांच्या घरी गेले, जिथे लालू प्रसाद थांबले आहेत. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सूत्रांनी सांगितले की, त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली. त्यांच्या दिल्ली भेटीदरम्यान, कुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना भेटण्याची शक्यतासुद्धा वर्तवली आहे.”
https://m.rediff.com/news/commentary/2023/apr/11/nitish-meets-lalu-in-delhi-discusses-current-political-situation/177c3d4dc01497951468fb0de258a8a6
निष्कर्ष: निष्कर्ष : नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीचा जो व्हायरल फोटो अलीकडचा असल्याचा दावा केला जात आहे, तो त्यांच्या २०२३ मधील भेटीचा आहे. त्यामुळे आमच्या तपासानुसार व्हायरल फोटो जुना आहे.
