Fact Check Of Viral Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक व्हिडीओ सापडला आहे. त्यात अनेक महिला भारतीय जनता पक्षाचे (भाजप) चिन्ह असलेल्या गाडी चालवणाऱ्या एका पुरुषाबरोबर वाद घालताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, यात बिहारमधील महिला सिंदूर वाटण्यासाठी आलेल्या गाडीबरोबर भांडत असल्याचे दाखवले आहे.
तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ जुना असून त्याचा ‘ऑपरेशन सिंदूर’शी काहीही संबंध नाही.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर राम शंकर आझाद यांनी हा व्हिडीओ “तो बिहारमध्ये सिंदूर वाटण्यासाठी गेला आहे आणि महिलांकडून त्याचे अशाप्रकारे स्वागत केले जात आहे”, अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर युजर्सही हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर करत आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=1039065841659971
https://www.facebook.com/reel/1243170553995719
तपास:
आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
याद्वारे आम्हाला २५ ऑक्टोबर २०२० रोजी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओची आवृत्ती सापडली.
https://www.facebook.com/watch/?v=3140957622683130
कॅप्शनमध्ये असे म्हटले होते : “मुज़फ़्फ़रपूर के कुढ़नी से BJP विधायक केदार प्रसाद गुप्ता की प्रचार गाड़ी एक गाँव में पहुँची तो महिलाओं ने इतनी गंदी-गंदी गालियाँ दीं कि आप कल्पना भी नहीं कर सकते। महिलाओं ने गाड़ी पर पोस्टर फाड़ डाले और गाड़ी को उलटा भागने पर मजबूर कर दिया। #ViralVideo”
जेव्हा मुझफ्फरपूरमधील कुढणी येथील भाजपा आमदार केदार प्रसाद गुप्ता यांच्या प्रचाराची गाडी गावात पोहोचली, तेव्हा महिलांनी त्यांना इतकी शिवीगाळ केली की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. महिलांनी गाडीवरील पोस्टर फाडले आणि गाडीला परत फिरण्यास भाग पाडले. #व्हायरलव्हिडिओ
त्यानंतर आम्ही हिंदीमध्ये कीवर्ड सर्च केला, ज्यामुळे आम्हाला या घटनेबद्दलच्या बातम्या मिळाल्या.
आम्हाला हेडलाईन्स बिहारवर या घटनेबद्दलचा एक व्हिडीओ रिपोर्टही सापडला, जो चार वर्षांपूर्वी अपलोड केला होता.
निष्कर्ष : भाजपा आमदाराच्या प्रचाराच्या गाडीला बिहार निवडणुकीत २०२० मध्ये परत पाठवल्याचा व्हिडीओ, आता ‘ऑपरेशन सिंदूर’शी जोडून अलीकडील असल्याचा दावा करत शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.