प्राण्यांकडून बर्‍याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. प्राणी निसर्गाचा, नैसर्गिक भावनांचा आदर करतात. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून प्राणी नकळतपणे अनेक संदेश देत असतात. सध्या असाच दोन शिकारी पक्ष्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘आपण दोघे भाऊ-भाऊ…सारे मिळून वाटून खाऊ ’ या सूत्राचा पुरेपूर वापर करत आकाशात उंचावर उडणाऱ्या या शिकारी पक्ष्यांनी उंच आकाशात जेवण एकमेकांसोबत वाटून खाताना दिसून आले. या दोन पक्ष्यांमधली बॉण्डिंग पाहून सारेच जण आश्चर्यचकित होऊ लागले आहेत.

हिंस्र प्राण्यांप्रमाणे असेच काही पक्षीही खतरनाक आहे. अशाच एका खतरनाक पक्ष्याने हवेत उडत उडत दुसऱ्या पक्ष्याची शिकार केली आहे. हा पक्षी म्हणजे बहिरी ससाणा. खतरनाक शिकारी पक्षी म्हणून त्याला ओळखलं जातं. ससाणा ज्या पद्धतीने पक्ष्यावर हल्ला करतो ते पाहूनच धडकी भरते.

आणखी वाचा : ताज हॉटेलसमोर ‘Bamb Aagya’ गाण्यावर तरूणीने केला डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले…

व्हिडीओत पाहू शकता ससाणा आपले विशाल पंख पसरून उडत आहे. त्याने एका चिमणीची शिकार केल्याचं दिसून येत आहे. आपली शिकार घेऊन तो आकाशात उंचावर उडताना दिसतोय. या व्हिडीओला पाहून असं वाटतंय की या ससाण्याने आता आताच ही शिकार केली असावी. त्याचवेळी त्याच्या खालच्या बाजूने आणखी एक बहिरी ससाणा येतो आणि पहिल्या ससाण्याच्या पुढे आपले हात पसरवतो. हे पाहून पहिला ससाणा अगदी सहज आपली शिकार हवेत सोडून देता आणि त्याला खालच्या बाजूला असलेला ससाणा अगदी आरामशीर पकडतो. हा आश्चर्यचकित करणारा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : सायकल चालवता चालवता गोरिला धापकन खाली पडला, रागात त्याने काय केलं? पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO: डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत मोबाईल हिसकावला, ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याचा शहाणपणा नडला

हा व्हिडीओ ta2020photography नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. आकाशात उंच उडणाऱ्या या दोन शिकारी पक्ष्यांमधली केमिस्ट्री आणि बॉण्डिंग लोकांना खूपच आवडू लागली आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण या बहिरी ससाण्याच्या चतुराई आणि समजूतदारपणाचं कौतुक करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.