सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात १० एकर बागायत असलेल्या शेतकऱ्याने लिंबू विकत विकत आपली व्यथाच सांगितली. “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवाराला फोन”, असं म्हणत हा शेतकरी ग्राहकांचं लक्ष वेधताना व्हिडीओत दिसत आहे.

या व्हिडीओत लिंबू विक्रेता शेतकरी “१० एकर बागायत हाय, पण पोराला पोरगी कोणी देईना” असंही सांगताना दिसत आहे. हा शेतकरी वैरागच्या बाजारात लिंबू विकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्याचे अद्याप नाव समजलेले नाही, मात्र हा शेतकरी वैराग परिसरातीलच असल्याचं समोर आलंय.

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
sangli crime news, cloroform for md drugs marathi news
सांगली: तासगाव तालुक्यातील शेतात ११ लाखांचे द्रवरुप क्लोरोफार्म जप्त, एमडीसाठीचा कच्च्या मालाचा साठा
Online Betting
सट्टेबाजीत दीड कोटींचं नुकसान, कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; पत्नीने उचललं टोकाचं पाऊल!

व्हिडीओ पाहा :

एकूणच शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत तुटपुंजा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी हवालदील आहेत. दुसरीकडे महागाईचा आगडोंब वाढला आहे. अशात शेतकऱ्याला दैनंदिन उदरनिर्वाह करणं कठीण होत आहे. अशातच मुलांचं शिक्षण, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांनी घेरलेल्या शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळेच राज्यासह देशात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर शेतकरी आपले प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ देखील त्याच अभिव्यक्तीचा प्रकार असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा : या चिमुकलीचा व्हिडीओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ; Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, “ही तर बॉर्न डान्सर”

केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्या शेतीविषयक समजेचं राजकीय वर्तुळातून अनेकदा कौतुक होतं. दुसरीकडे वयाच्या या टप्प्यावरही शरद प वार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीप्रश्न समजून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांना वेगळं स्थान आहे. व्हायरल व्हिडीओतील शेतकरी देखील शरद पवार यांचा उल्लेख करत शेतमालाच्या विक्रीचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शरद पवार यांचा शेतकऱ्यांमधील प्रभावही यातून दिसतो.