scorecardresearch

Flashback 2021: बर्नी सँडर्स ते पावरीपर्यंत मजेशीर मीम्सनी या वर्षात वेधलं लक्ष; आठवलं तरी हसू येईल

२०२२ या वर्षात स्वागत करण्यापूर्वी २०२१ या वर्षात ज्या गोष्टींनी पोट धरून हसायला लावलं अशा घडामोडींकडे लक्ष टाकूयात.

Memes_2021
Flashback 2021: बर्नी सँडर्स ते पावरीपर्यंत मजेशीर मीम्सनी 'या' वर्षात वेधलं लक्ष; आठवलं तरी हसू येईल

२०२१ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २०२२ या वर्षात स्वागत करण्यापूर्वी २०२१ या वर्षात ज्या गोष्टींनी पोट धरून हसायला लावलं अशा घडामोडींकडे लक्ष टाकूयात. २०२१ मध्ये सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. या मीम्सच्या माध्यमातून अमेरिका राष्ट्राध्यक्ष शपथविधीतील बर्नी सँडर्स ते बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावच्या ‘जल लिए’पर्यंतचे मीम्स खूप व्हायरल झाले होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या वर्षातील असे काही व्हायरल मीम्स दाखवणार आहोत, जे केवळ व्हायरल झाले नाहीत तर त्यांनी लोकांचे खूप मनोरंजनही केले.

बर्नी सँडर्स
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र, अमेरिकेचे ज्येष्ठ सिनेटर आणि राष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार बर्नी सँडर्स यांची सर्वाधिक चर्चा झाली. बर्नी सँडर्स हे शपथविधीच्या सोहळ्यात विंटर जॅकेट आणि हातमोजे घालून सहभागी झाले होते. शपथविधी सोहळ्यात ते आपल्या खुर्चीवर बसले होते. त्यावेळी काढण्यात आलेला बर्नी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सुएझ कालव्यात अडकलेलं एव्हर गिव्हन जहाज
मार्चमध्ये एव्हर गिव्हन अडकल्यानंतर जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात व्यस्त शिपिंग मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अधिकारी कंटेनर जहाज हलविण्यास धडपडत असताना नेटिझन्सने ऑनलाइन धमाका केला. त्याला एक मीम्स ट्रीटमेंट दिली. जहाज मोकळे करण्यासाठी जेव्हा जेसीबी आणले गेले तेव्हा मीम्स अधिकच व्हायरल झाले.

जल लिजिए
अभिनेत्री अमृता राव आणि अभिनेता शाहीद कपूर यांच्या विवाह चित्रपटातील एका डॉयलॉगने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. ‘जल लिजिए’ या मीम्सने सोशल मीडियावर धुमाकूल घातला. हे मीम्स नेटकऱ्यांनी डोक्यावर उचलून धरले.

पावरी हो रही है
पाकिस्तानमधील दानीर मोबीनने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्याच्या ‘पावरी हो रही है’ बोलण्याची शैली लोकांनी फार आवडली आणि नेटकऱ्यांनी त्याचे मीम्स बनवले.

शशी थरूर यांचा नारळ फोडतानाचा फोटो
काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या इंग्रजी शब्दांची चर्चा सोशल मीडियावर असते. मात्र या वर्षात त्यांचा नारळ फोडतानाचा फोटो चांगलाच व्हायरला झाला. नेटकऱ्यांनी फोटोशॉप करत वेगवेगळ्या शैलीत शशी थरूर यांना दाखवलं होतं.

प्रियंका चोप्रा बॉल ड्रेस
बॉलिवूड कलाकार हे कायमच चर्चेत असतात. मग ते त्यांचे चित्रपट असो किंवा त्यांचा फॅशन सेन्स असो. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रासोबत असेच काहीसे झाले आहे. तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी तर प्रियांकावर मजेदार मीम्स तयार केले होते.

बागपतवाले चाचा
बागमतमधील हाणामारीचा व्हिडिओ कुणीही विसरू शकत नाही. या व्हिडिओतील चाचाला कुणाच्याही लगेच लक्षात येईल. लाठी हातात घेऊन मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरला झाला होता. युजर्संनी त्यांच्या लूकची तुलना वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईनशी केली होती.

मेटा गाला २०२१
मॉडेल किम कार्दशियन जेव्हा ‘मेट गाला २०२१’च्या रेड कार्पेटवर आली तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा तिच्या पोशाखावर खिळल्या होत्या. त्यात तिच्या शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. ती पूर्णपणे काळ्या कपड्यात दिसली. अशा परिस्थितीत तिच्या पोशाखाबद्दल सोशल मीडियावर बरेच मीम्स आणि जोक्स शेअर केले गेले.

या सर्व मीम्सनी २०२१ या वर्षात लक्ष वेधून घेतलं होतं. मजेशीर गोष्ट नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटत नाही. त्याचं प्रत्येक घडामोडीकडे बारीक लक्ष असतं. एखादी घटना घडली की, लगेचच त्याचे मीम्स तयार केले जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2021 at 16:42 IST