Flight Fighting Viral Video : अहमदाबाद विमान अपघातानंतर लोक विमान प्रवास करण्यास घाबरत आहेत, या अपघातानंतर तांत्रिक बिघाडामुळे देशासह जगभरातून विमान उड्डाणं रद्द होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यातच सोशल मीडियावर विमानांशी संबंधित अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत. यात एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसायला येईल आणि प्रश्न पडेल की, नक्की हे विमान आहे की मच्छीमार्केट. कारण एक महिला प्रवासी दोन पुरुष प्रवाशांसह कचाकच भांडताना दिसतेय. यात धक्कादायक बाब म्हणजे महिलेला तिचा मुलगा शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्यालाही सर्वांसमोर धोपटायला सुरुवात करते. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

विमानात प्रवाशांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद होतो. यावेळी महिला मागच्या सीटवरील दोन पुरुष प्रवाशांना इतकी बडबड करते की, ऐकून प्रश्न पडतो की हे विमान आहे की मच्छीमार्केट. यावेळी महिला तिच्या मुलालाही सोडत नाही.

भांडण दुसऱ्यांशी पण मार खाल्ला मुलाने

विमानातील इकॉनॉमी क्लासमधील हा व्हिडीओ आहे, ज्यात एक महिला पुरुष प्रवाशांबरोबर कचाकचा भांडताना दिसतेय. तिच्या बोलण्यावरून तरी असे समजते की, पुरुष प्रवासी पेशाने जादूगार आहेत जे विमानात कबूतर घेऊन प्रवास करत होते. यावेळी त्यांच्याकडील एक पक्षी उडून तिच्या डोक्यावर बसला, ज्यामुळे ती भडकली. विमानात अशाप्रकारे कबुतर घेऊन कोणी प्रवास करतं का, असा सवाल करत तिने तुमची जादू विमानाबाहेर दाखवायची असे म्हटले. दोन्ही पुरुषदेखील महिलेशी जोरदार वाद घालत राहिले. हा वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी अपशब्दांचा वापर होऊ लागला. यावेळी फ्लाइट अटेंडंट्सने महिलेसह त्या पुरुष प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही महिलेने भवान्यांनो तुम्ही शांत राहा म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. यानंतर महिलेच्या मुलाने तिला शांत राहण्यास सांगितले, पण संतापलेल्या महिलेने चक्क मुलालाच सर्वांसमोर मारण्यास सुरुवात केली.

मुलगा वारंवार आईला सांगतोय की, शांत राहा, शांत राहा, पण महिला शांत राहण्यास काही तयार नाही; तिने भांडणाचा सगळा राग त्या बिचाऱ्या मुलावर काढला. पण, यात नेमकी चूक तुम्हाला कोणाची वाटते कमेंट करून सांगा.

दरम्यान, अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट्स करत त्या मुलाबद्दल दया व्यक्त करत आहेत, कारण काही चुकी नसताना त्याला आई मारहाण करतेय. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, भारतात सध्या शिक्षणाचा मोठा अभाव आहे. दुसऱ्याने लिहिले की, मुलांबरोबर नेहमी असेच घडते. काही चूक असो वा नसो, आई नेहमीच मुलांना मारते आणि नंतर विचारते काय झाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण हा व्हिडीओ मेडअपच्या उद्देशाने बनवण्यात आलेला आहे, म्हणजेच विमानात अशाप्रकारची भांडण झालीच तर एअर होस्टेसने काय करावे, ती कशाप्रकारे सोडवावीत याचे ट्रेनिंग यादरम्यान दिले जाते.