Western Friends Try Desi Mangoes : आंबा म्हटलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आपल्यापैकी अनेकांना कोणते कोणते फळ आवडत नाही पण आंबा खायला आवडत नाही अशी व्यक्ती तुम्हाला क्वचितच भेटेल. आंबा हा ‘फळांचा राजा’ असण्यामागे एक कारण आहे. उन्हाळा आला आंब्याचे आगमन घरोघरी झाले की सर्वजण आंब्यावर तुटून पडतात. रसाळ आणि गोड आंबा हा प्रत्येक खाद्यप्रेमीच्या प्रेमाचा विषय असतो. हापूस आंब्यापासून तोतापुरी आंब्यापर्यंत, बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहेत. अर्थात, देशी आंबे इतके छान आहेत की, ते खाणे कोणीही विसरत नाही. तुमचे मत काय आहे माहिती नाही, पण या मताबाबत हा कंटेंट निर्माता राशी अग्रवाल सहमत आहे. जेव्हा राशी अग्रवालने तिच्या परदेशी मित्रांना भारतीय आंब्यांशी ओळख करून दिली तेव्हा ते त्याच्या प्रेमात पडले. पहिल्यांदा आंबा खाल्यानंतर त्यांची जी प्रतिक्रिया होती ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आम्सटरडॅममधील राशीने पोस्ट (@rashi.agarwal)शेअर केलेली आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये राशीच्या हातात रत्नगिरी हापूस आंब्याच्या फोंडीनी भरलेली एक वाटी दिसते आणि तिच्या मैत्रिणी एक एक करून आंब्याच्या फोडींचा आनंदाचा आस्वाद घेत असतानाचा क्षण टिपत आहे. तिने वाटी तिच्या स्टँड-अप कॉमेडियन मैत्रिणी दर्याकडे नेत म्हटले, “तुमच्या आयुष्यातील पहिला भारतीय आंबा!”. आंब्याची एक फोड खाताच तिला तो आवडतो अन् ती पुढे म्हणते, “अरे देवा! याआधीचे सर्व आंबे खोटे होते! हे खूप चांगले आहे.
स्टँड-अप कॉमेडियन ओमर अलजालौद, चावल्यानंतर म्हणतो, “तोंडात वितळल्यासारखे वाटते!” “खूपच मलाईदार, खूप कमाल, खूप गोड. मला भारतीय आंबा खूप आवडतो.” सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
कमेंट सेक्शनमध्ये दर्या पुढे म्हणाले, “ एकीकडे बाळांनी पहिल्यांदाच लिंबू चाखल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत आणि दुसरीकडे, ३० वर्षांच्या प्रौढांनी पहिल्यांदाच खरा आंबा चाखल्याचे व्हिडिओ आहेत.”
आणखी एका आंबाप्रेमीने सांगितले की, “मी दरवर्षी हंगामातील पहिला आंबा खातो तेव्हा मलाही असेच वाटते.”
“व्हिडिओ पाहून मला वाईट वाटते की त्यांना खऱ्या आंब्याची चव कशी असते हेच माहित नाही,” एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे.