Nagpur Viral Video : सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण गणेशोत्सवामध्ये रमलेले दिसत आहे. ठीक-ठिकाणी सार्वजनिक गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे त्यामुळे सार्वजनिक गणपती बघायला गणेश भक्त गर्दी करताना दिसत आहे. (Video : Foreigner making friendship with the elephant of Nagpur in Ganeshotsav)

महाराष्ट्रात प्रत्येक शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येत आहे. सध्या नागपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फॉरेनर गणेशोत्सवामध्ये हत्ती बरोबर मैत्री करताना दिसत आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की नागपूर येथील गणेशोत्सवात हत्तीने सहभाग घेतलाय. त्यावेळी एक महिला फॉरेनर त्याच्याशी मैत्री करताना दिसत आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक भला मोठा हत्ती दिसेल. हा हत्ती सुंदर सजवला आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एक फॉरेनर हत्तीजवळ जाते आणि हत्तीला मिठी मारते तेव्हा हत्ती सुद्धा प्रतिसाद देत त्याची सोंड तिच्या डोक्यावर आणि खांद्यावर ठेवतो. हे पाहून फॉरेनर खूप आनंदी होते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओवर ती लिहिते, “गणेशोत्सवात हत्ती बरोबर मैत्री करताना.. नागपूर ,भारत.”

हेही वाचा : PHOTO: पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं; ब्लिंकिटवर कमेंट करणं पडलं भारी, मिळाला असा रिप्लाय की वाचून पोट धरुन हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

जॅकलीन क्रूझ या फॉरेनरने jamocu या तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला सांगते की हत्तीची सोंड दिसते त्यापेक्षा जड आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “नागपुरमध्ये कुठे आहे? मला या हत्तीला भेटायचे आहे” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला या काळात तुम्हाला हत्तीचा आशीर्वाद मिळाला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला छान वाटले की तुम्ही नागपुरमध्ये आनंद घेत आहात!”

हेही वाचा : ‘शेवटी बाप्पा एकच…’ लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची तारेवरची कसरत; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मनी नाही भाव…”

हत्तीचे महत्त्व अनन्यसाधारण

गणपतीची मस्तक हे हत्तीची आहे. त्यामुळे गणपतीच्या मस्तकाला गजमस्तक असे सुद्धा म्हणतात आणि याच कारणाने गणेशास दुसरे नाव गजानन किंवा गजवदन असे देखील आहे.