Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ महाकुंभ मेळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये फॉरेनर्स चुलीवरील वरणभाताचा आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. गेल्या महिन्यात १३ जानेवारीपासून हा महाकुंभ मेळा सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या महाकुंभ मेळ्यात हजारो भाविक, संत, साध्वी, तसेच फॉरेनर्सनी हजेरी लावली आहे. अशातच हा फॉरेनर्सचा व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन फॉरेनर्सन पत्रावळीत अन्न घेताना दिसत आहे. ते महाकुंभमेळ्यात महाप्रसादाचा आनंद घेत आहे. चुलीवरील वरण भात खाताना दिसत आहे. या दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पिझ्झा, बर्गर सोडा, फॉरेनर्सला चुलीवर बनवलेला डाळ भात आवडला. महाकुंभमेळा २०२५”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

indorireporter21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाकुंभ मेळ्यात फॉरेनर्सना आवडले खेडूत जेवण”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्या भारताची हीच ओळख आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “यांना सुद्धा माहिती आहे की भारतीय जेवण किती पौष्टिक असते ते” आणखी एका युजरने लिहिलेय, “महाकुंभ मेळ्यातील महाप्रसाद आहे” एक युजर लिहितो, “महाप्रसादाच्या जेवणाची बरोबरी कोणीही करू शकत नाही” तर एक युजर लिहितो, “अतिथी हे आपल्यासाठी देवासमान आहे. जय हिन्द, जय भारत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.