काहीजण आपलं कर्तव्य बजावत असताना माणुसकीलाही तितकंच महत्त्व देतात. सध्या सोशल मीडियावर एका वाहतूक पोलिसाचा फोटो व्हायरल होत आहे. अनेकदा वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं की तो लाच घेणार, असा सर्वसाधारण समज असतो. पण सगळेच पोलीस तसे नसतात. काही जण आपल्या कामामुळे आणि स्वभावामुळे जगापेक्षा वेगळे ठरतात. अशाच एका कर्तव्यदक्ष आणि माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या वाहतूक पोलिसाचा फोटो आमदार विवेक पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. हा फोटो व्हायरल होत असून अनेकांनी या पोलिसाचं कौतुक केलंय.

Video : वरातीत फटाक्यांच्या आवाजानं घोडी बिथरली, नवरदेवासह थेट विहिरीतच उडी मारली

एका कार्यक्रमावरून विवेक पंडित परतत होते. तेव्हा पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी त्यांनी गाडी रस्त्यालगत थांबवली. वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस समर देवानाथ यांनी पंडित यांना गाडी पुढे घ्यायला सांगितली. मला औषध घ्यायचे आहे. माझा एक मदतनीस पाणी आणण्यासाठी दुकानात गेलाय. तो आला की लगेच गाडी पुढे घेतो, असं पंडित यांनी समर यांना सांगितलं. तेव्हा यावर काहीच न बोलता समर आपल्या मोटरसायकलजवळ गेले. त्यांनी पंडित यांना पाणी आणून दिलं. माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या वाहतूक पोलिसाचा फोटो पंडित यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी वाहतूक पोलिसाचं कौतुक केलं आहे. मुंबई पोलिसांनी देखील पंडित यांचे आभार मानले आहेत. सामान्य नागरिकांना मदत करण्याचे शक्य तेवढे प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.

…आणि यूट्युबच्या मोस्ट वॉच व्हिडिओचा किताब ‘गंगनम स्टाईल’ गमावून बसला