देशभरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केल्याने बहुतांश अपघात घडत असतात. यावेळी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका अशा सूचना केल्या जातात, अनेकदा नियम मोडणाऱ्यांविरोधात चलन फाडले जाते, पण तरीही अनेक वाहनचालक त्याच त्याच चुका करतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एका बाईकस्वार तरुणाला फोनवर बोलणं जीवावर बेतलं आहे, यात एका बाईकस्वार तरुणाला भरधाव वेगात येणारा एक भलामोठा ट्रक थेट उडवत नेतो, या भयंकर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोनवर बोलत बाईकस्वार क्रॉस करत होता रस्ता

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्ता क्रॉस करण्यासाठी एका बाईकवर दोन तरुण थांबलेले आहेत. तितक्यात त्यांच्या मागून मोबाईलवर बोलत एक बाईकस्वार तिथे येते आणि तो मागे – पुढे न पाहता थेट क्रॉसिंगसाठी बाईक पुढे नेतो. तेवढ्यात एक भरधाव वेगाने भलामोठा ट्रक आला आणि त्याने बाईकस्वाराला थेट धडक देत फरपटत नेते. या अपघाताचा व्हिडीओ खूपच भयावह आहे.

ट्रकने बाईकस्वाराला दिली धडक

दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर ट्रकने त्याला पुढे फरपटत नेले, यावेळी मागे रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलेले तरुण त्याला वाचवण्यासाठी धावणार, मात्र तेवढ्यात ट्रकने त्याला दूरवर फरपटत नेले होते. ट्रकचा वेग खूप जास्त होता. मोबाईलवर बोलत असलेल्या व्यक्तीने ना समोरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडे पाहिले, ना रस्ता ओलांडण्यापूर्वी थांबण्याचा प्रयत्न केला. या बाईकस्वाराने थेट रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली आणि असा भीषण अपघात झाला.

हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, लोक इतरांना या घटनेनंतर सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले, “व्हिडीओ कुठलाही असो, पण गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या लोकांसाठी हा धडा आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “हा फक्त निष्काळजीपणा आहे. आधीच उभ्या असलेल्या लोकांना तो मूर्ख समजत होता का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एका ट्विटर युजरने लिहिले, ‘सावधानी हटी, दुर्घटना घटी! हे स्लोगन आपल्याला अनेक रस्त्यांवर वाचायला मिळते; पण आजची तरुण पिढी स्वतःला सर्वात हुशार समजते. एकाने लिहिले की, ‘हा अपघात इतका भीषण आहे, क्वचितच त्या व्यक्तीचा जीव वाचू शकला असेल. पण, फोनवर बोलणं किती धोकादायक आहे, याचा हा जिवंत पुरावा आहे.