हत्ती त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी, भावनिकतेसाठी, कौटुंबिक बंधांसाठी ओळखले जातात. हत्ती हे अत्यंत भावनिक असतात. हत्तीचे कुटुंब असो किंवा त्यांची काळजी घेणारे एखादी व्यक्ती असो हत्ती त्यांच्याबरोबर भावनिकरित्या जोडले जातात. काही दिवसांपूर्वी हत्तींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये पावसापासून आपल्या केअर टेकरला वाचवण्यासाठी हत्ती प्रयत्न करताना दिसत होते. हत्तींच्या भावनिकता दर्शवणारे कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असतात. हत्तींची कोणी मदत केली तर ते नेहमीच आभार व्यक्त करतात. अशाच एका हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील हा व्हिडिओ एका वन अधिकार्यांनी शेअर केला आहे. जंगलात त्यांना एक हत्तीचे पिल्लू सापडले ज्याच्या आईपासून ताटातूट झाली होती. वनअधिकाऱ्यांनी या हत्तीच्या पिल्लाची त्याच्या आईबरोबर पुन्हा भेट घडवून आणली. व्हिडिओमध्ये हत्तीचे पिल्लू वन विभागाच्या वाहनाकडे धावत येतो अन् मदत मागतो.
भारतीय वनसेवेच्या निवृत्त अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओची सुरुवातीला हत्तीचे पिल्लू घाबरलेले आणि गोंधळलेले दिसत आहे. एका जंगलातील रस्त्यावर ते आपल्या आईला शोधत आहे. आईला शोधून ते हताश झाले आहे. दरम्यान, वन विभागाची गाडी दिसताच ते धावत त्यांच्याकडे येते आणि मदत मागत असल्याचे दिसते. वन पथक काळजीपूर्वक त्या लहान हत्तीला त्या भागाकडे घेऊन जाते जिथे त्याची आई शेवटची दिसली होती. आईने तिच्या बछड्याला ओळखले आणि ते स्वीकारले याची खात्री करण्यासाठी, एका अधिकार्याने हत्तीच्या शेणाचा काही भाग बाळाच्या सोंडेवर आणि पायांवर हळुवारपणे लावले.
आपल्या आईकडे जाण्यापूर्वी हत्तीचे पिल्लू आपल्या सोंडेतून सौम्यपणे आवज करत चित्कारतो, जणू काही धन्यवाद म्हणत आहे. तो जंगलात परत जाण्यास सुरुवात करताच, एक अधिकारी त्याला “हा, जा. जा, जा, जा (पुढे जा)” असे म्हणत प्रोत्साहन देतो. व्हिडिओचा शेवट हत्तीचे पिल्लू त्याच्या आईबरोबर चालताना दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करताना नंदा यांनी लिहिले की, “काझीरंगा येथे छोटू आईपासून वेगळा झाला होता. नंतर तो त्याच्या आईशी भेट झाली. मानवी वास घालवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी हत्तीच्या आईचे शेण पिल्लाच्या अंगावर लावले. शेवटी आनंदाने त्यांची भेट झाली..”
या व्हिडिओने सोशल मीडियावर हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतले. “किती सुंदर व्हिडिओ आहे. काझीरंगा शब्दांपलीकडे सुंदर आहे. कमी मानवी वस्ती आणि जवळपास व्यापारीकरण कमी करून जसे आहे तसेच राखले पाहिजे,” एका वापरकर्त्याने लिहिले. “अरे बाबा, तो खूप गोंडस आहे. मी काझीरंगाजवळ वाढलो हे माझे भाग्य होते. आमच्या लॉनमध्ये (चहा मळ्यातील, लोखोजान) काही दिवस एक ब्लॅक पँथर होता. ते दिवस खास होते. देवाचे आभार, मला निसर्गाच्या कुशीत ठेवल्याबद्दल, जरी तात्पुरते असले तरी. नुमालीगडमध्येही बरेच हत्ती आहेत,” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली.
“अरे, ही खूप सुंदर गोष्ट आहे. धन्यवाद,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.