Viral photo: आपल्याकडे ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. पाहुया अशाच काही भन्नाट शायरी. तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “अंगणात केर नाही तर झाडतेस कशाला….मनात प्रेम नाही तर पाहतेस कशाला..हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दीर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहेत. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. यालाच वैतागलेल्या ट्रक मालकानं ही शायरी ट्रकच्या मागे लिहली आहे.

पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा फोटो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या फोटोला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत. एकानं म्हंटलंय, “लग्न ठरत नाहीये म्हणून ट्रक मालक संतापला आहे”, तर दुसरा म्हणतो, “भाऊला प्रेमात नक्कीच धोका मिळालेला दिसतोय.” तर आणखी एकानं, “अरे दादा टेंशन नको घेऊ मिळेल तुलाही कुणीतरी”