Funny video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. या व्हिडिओंमध्ये तुम्ही अनेकदा लोक वेगवेगळ्या गोष्टी करताना पाहतात. यातील काही व्हिडिओ असे आहेत की ते तुम्हाला खूप भावूक करतात. तर असे काही व्हिडिओ आहेत. जे पाहिल्यानंतर चेहऱ्यावर आपोआपच हसू उमलते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी माईक घेऊन गायीची मुलाखत घेताना दिसत आहे. यानंतर गायही आपली प्रतिक्रिया देते. हे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘मुलं देवाघरची फुले’

‘मुलं देवाघरची फुले असतात’ ही म्हण भारतात शतकानुशतके जुनी आहे. जग कसं दिसतं ते मुलांना कळत नाही. मात्र, प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतःची दिसते. असाच काहीसा प्रकार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

तुम्ही आतापर्यंत पत्रकारांना अनेकांच्या मुलाखती घेताना पाहिल्या असतील. किंवा अनेकांनी मुलाखती देताना पाहिलं असेल. मात्र कधी प्राण्यांना मुलाखत देताना पाहिलं आहे का? नाही ना.. मग या व्हिडीओमध्ये पाहा. यामध्ये एक लहान मुलगी माईक घेऊन शेजारी उभ्या असलेल्या गायीकडे जाते. यानंतर ती मुलगी माईकवर गायीसाठी काहीतरी बोलते. आणि यानंतर ती जोरात आवाज करते. यानंतर ती माईक गायीच्या तोंडाकडे वळवते. यानंतर गायही तोच आवाज करते. तुम्ही मुलीच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे असे दिसते. हा क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “बिर्याणी कधीही संपू शकते त्यामुळे…” पुण्यात हॉटेलबाहेर लावलेली पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

लोक कमेंट करत आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @pubity नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १.८ लाख २० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट करताना ‘अशा मुलाखती आणखी बघायला आवडतील’ असं लिहिलं आहे. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘ती भविष्यात रिपोर्टर बनू शकते.’ यावर टिप्पणी करताना आणखी एका युजरने लिहिले, ‘किती अविश्वसनीय मुलाखत आहे.’ ‘हा ऐतिहासिक क्षण आहे,’ अशी टिप्पणी आणखी एका युजरने केली आहे. आणखी एका युजरने ‘किती सुंदर क्षण आहे’ अशी कमेंट केली आहे.