Boy’s hilarious trick to skip school :शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ आहे कारण तिथे घालवलेला प्रत्येक क्षण आपल्यासाठी सुंदर आठवण ठरतो जो कोणीही कधीही विसरू शकत नाही. पण शाळेत असताना आपल्याला शाळेची किंमत कुठे कळतं होते तेव्हा आपल्यापैकी अनेकजण शाळेत न जाण्यासाठी हट्ट करत असू, काही ना काही कारणे देत असू. पण तेव्हा आपले पालक काहीही करून आपल्याला शाळेत पाठवत असे. आपल्या मुलांना शाळेत पाठवणे हे पालकांसाठी मोठं अवघड काम असते. कारण लहान मुलं कधी झोप पूर्ण झाली, कधी ताप आला तर कधी पोट दुखत तर कधी होम वर्क नाही केला अशी कारण देऊन शाळेत जाणे टाळतात. अशा वेळी मुलांना शाळेत जाण्यासाठी मनवण्यात पालकांना आपली ऊर्जा खर्च करावी लागते. अशाच एका शाळेत न जाण्याचा हट्ट करणाऱ्या चिमुकल्याचा आणि त्याच्या पालकांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
शाळेत न जाण्यापासून वाचण्यासाठी एका चिमुकल्याने मोठी शक्कल लढवली आहे. हीच गोष्ट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मजेदार व्हिडिओत एका लहान मुलाने शाळेत जाणं टाळण्यासाठी असा प्रयोग केला की सगळेच हसून लोटपोट झाले आहेत.
व्हिडिओत दिसतं की, सकाळी शाळेत जायची वेळ झाल्यावर मुलाने खाटेला अक्षरशः सापासारखं वेटोळे घालून चिकटून बसला आहे. आई-वडील त्याला उठवायचा प्रयत्न करत असले तरी तो हट्टाने खाट सोडायलाच तयार नाही. शाळेत न जाण्यासाठी त्याने घेतलेला हा “सर्प अवतार” पाहून घरचेही थक्क होतात.
पण खरी गंमत तर त्यानंतरची आहे! मुलाला मनवण्यात अपयशी झाल्यावर घरच्यांनीही भन्नाट जुगाड शोधला. त्यांनी मुलाला खाटेसकट उचलून घेतलं आणि थेट शाळेच्या दिशेने रवाना झाले! ही संपूर्ण घटना पाहून नेटिझन्स हसून लोटपोट झाले आहेत.
एक्स (माजी ट्विटर)वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, हजारो जणांनी त्यावर मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, “हा विद्यार्थी तर गजब आहे! खाटेला जशी मिठी मारलीय, तशी कोणी पुस्तकांनाही मारली असती तर डॉक्टर झाला असता.” दुसर्याने टिप्पणी केली, “बाळाचा हट्ट आणि आई-वडिलांचा देसी जुगाड – परफेक्ट कॉम्बिनेशन!” तर काहींनी पालकांना सल्लाही दिला की, “मुलं शाळेत जायला तयार नसतील, तर त्यांच्या भीतीचं कारण जाणून घ्या, रागावू नका.”
व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचं म्हटलं आहे. काही ना काही कारण देऊ शाळेत जाणे टाळणारे आपण सगळेच त्या लहान मुलात स्वत:ला पाहत असल्याचं यूजर्सनी लिहिलं. इंटरनेटवर सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे.
