Gaza Strip Father Viral Photo: इस्त्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी नवनवीन व्हिडीओ, पोस्ट, दावे व्हायरल होत असतात. लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला असाच एक फोटो दिसून आला. या चित्रात एक व्यक्ती पाच मुलांना घेऊन जात असल्याचे दिसत आहे. हे चित्र अलीकडचे असून गाझा येथील युद्धग्रस्त भागातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स यूजर Huma Zehra ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील ही प्रतिमा शेअर करत आहेत.

तपास:

चित्राचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही आमचा तपास सुरू केला.

आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या:

a. तीक्ष्ण म्हणजेच शार्प चित्र
b. लहान मुलाचे पाय हे बॅकग्राउंडमध्ये विलीन होत होते
c. लहान मुलांच्या पायाला ६ बोटे असल्याचे दिसतेय
d. मुलाचे आणि बाबांचे हात एकत्र मर्ज होत आहेत.
e. अस्पष्ट बॅकग्राउंड

यामुळे हे अगदी स्पष्ट झाले की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून हे चित्र तयार करण्यात आले असावे. त्यानंतर आम्ही एआय-इमेज डिटेक्टर, ऑप्टिक एआय व नॉट द्वारे फोटो तपासाला. ज्याद्वारे आम्हाला हे स्पष्टपणे समजले की सदर फोटो हा AI द्वारे निर्मित केलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: गाझा येथील असल्याचा दावा केलेल्या ढिगाऱ्यांमधून मुलांना घेऊन जाणाऱ्या वडिलांचा व्हायरल फोटो AI ने बनवलेला आहे.